शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
3
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
4
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
5
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
6
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
7
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
8
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
9
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
10
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
11
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
12
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
13
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
14
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
16
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
17
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
18
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
19
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
20
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”

सुलीभंजन परिसरात बिबट्याचे पर्यटकांना जवळून दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 22:12 IST

Leopard in Sulibhanjan : काही पर्यटकांना रस्त्यावर फिरताना बिबट्या दिसून आला

ठळक मुद्देरिमझिम पावसात झाडीत निघून गेलावनविभागाच्या पथकाने राबविली शोध मोहीम

औरंगाबाद : सुलीभंजनवरून दत्त मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर बिबट्याने (leopard ) काहीवेळ दर्शन देऊन तो घनदाट झाडीत निघून गेला. पर्यटकांनी गुरुवारी सकाळी १०.३० वाजता हे क्षण मोबाइलमध्ये कैद केले. बिबट्या रस्ता पार करीत असताना पर्यटकांनी वाहने थांबविली होती. (Tourist seen Leopard in Sulibhanjan )

बिबट्याची अन्नसाखळी जुळली आहे. डोंगरावरील वनक्षेत्रात त्याचे वास्तव्य असून, शिकारीचा पाठलाग करीत तो रस्त्यावर आला असावा. त्यावेळी तो पर्यटकांच्या नजरेस पडला. काहीकाळ थांबून तो जंगलात निघून गेला. अचानक समोर बिबट्या पाहून पर्यटकांचे श्वासही गळ्यातच अडकला होता. काहींनी हिंमत करून हे क्षण मोबाइलमध्ये कैद करून व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याने सुलीभंजन परिसरातील वनरक्षक प्रशांत निकाळजे, आय्युब शाह नारायण जंगले, रहेमान शाह, वाल्मिक गवळे, बाबू भाई, काळे मामा, माजेद अली यांचे पथक शोधमोहिमेसाठी रवाना झाले.

सायंकाळपर्यंत शोधमोहीम...बिबट्याचा या परिसरात अधिवास असून, तो स्वत:हून कुणावरही हल्ला करीत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट वनक्षेत्र असून तो तो चुकून रस्त्यावर आला असावा. मानसाची चाहूल लागल्याने तो पसार झाला. पावसाळी वातावरण असल्याने पर्यटकांची दिवसभर गर्दी होते. खबरदारी घेत वनविभाग तसेच ग्रामस्थांनी सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबविली. नागरिकांनीही त्याची छेड काढू नये दिसल्यास वनविभागाला कळवावे. असे वनरक्षक प्रशांत निकाळजे यांनी सांगितले.

दर्शनासाठी कुटुंबासह सहलीवर...मारुती जंगले हे कुटुंबासह दर्शनासाठी गेले होते. सुलीभंजनकडून दत्तधाम मंदिराकडे येत असतांना सकाळी १०.३० वाजता बिबट्या रस्त्यावर जाताना दिसला. त्याला पाहून इतरही वाहने थबकली होती. असे नारायण जंगले यांनी सांगितले.

दिवसभर चर्चा...१५ दिवसांपूर्वीच वेरूळच्या घाटात व लेणी परिसरात बिबट्या दिसून आल्याने वनविभागाने त्याचा माग काढला होता, परंतु तो आढळला नाही. गुरुवारी सकाळी बिबट्या सुलीभंजन दत्तधाम मंदिर रोडवर दिसून आल्याने दिवसभर याचीच सोशल मीडियावर चर्चा सुरू होती.

टॅग्स :leopardबिबट्याAurangabadऔरंगाबादforestजंगल