शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवून पावणेतीन लाखांना गंडा

By admin | Updated: December 6, 2014 00:17 IST

औरंगाबाद : गुरुवारी हर्सूल परिसरात एअर पिस्टलने फायरिंग करणाऱ्या जावेद तडवी या आरोपीचे आणखी एक प्रकरण शनिवारी समोर आले.

औरंगाबाद : गुरुवारी हर्सूल परिसरात एअर पिस्टलने फायरिंग करणाऱ्या जावेद तडवी या आरोपीचे आणखी एक प्रकरण शनिवारी समोर आले. एका बेरोजगाराला पोलीस किंवा लष्करात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तडवीने त्याला २ लाख ७० हजार रुपयांचा गंडा घातला होता. या फसवणूकप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यातआला.पोलिसांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातील नगाव येथील राजेंद्र सुरेश पाटील हा युवक नोकरी शोधत होता. तेव्हा औरंगाबादेत राजे छत्रपती अकॅडमी चालविणारा जावेद नूरभाई तडवी याची पोलीस व लष्करात ओळख असून तो नोकऱ्या लावून देतो, अशी माहिती राजेंद्रलासमजली. राजेंद्रने त्याच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्याने औरंगाबादला बोलाविले. जुलै महिन्यात राजेंद्रने त्याची भेट घेतली तेव्हा ‘अडीच लाख रुपये दे, मी तुला नोकरी लावून देतो, आतापर्यंत अनेकांना पोलीस किंवा मिलिटरीत मी नोकऱ्या लावून दिल्या आहेत’ असे जावेदने सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून राजेंद्रने ३० जुलै रोजी जावेदला १ लाख रुपये रोख रक्कम दिली. त्याच दिवशी जावेदने राजेंद्रची ओळख मंत्री ज्ञानोबा जाधव (रा. लखमापूर तांडा, रेणापूर, लातूर) याच्यासोबत करून दिली. ‘जाधव तुझ्या नोकरीची आॅर्डर काढून देईल, फक्त त्याच्या सांगण्याप्रमाणे कर’ असे जावेदने सांगितले. मग जाधवनेही नोकरीची आॅर्डर काढण्यासाठी आणखी १ लाख ७० हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम जाधवने आपल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर जमा करून घेतली. नंतर मात्र जावेद आणि जाधव हे दोघे राजेंद्रचा फोन उचलेना अन् नोकरीचे काय झाले ते सांगेना. शेवटी राजेंद्र शुक्रवारी बेगमपुरा पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी जावेद व जाधवविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली.