विधानपरिषद निवडणूक : पदवीधरच्या मतमोजणीसाठी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी औरंगाबादेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 13:33 IST2020-12-03T13:32:47+5:302020-12-03T13:33:05+5:30
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विधानपरिषद निवडणूक : पदवीधरच्या मतमोजणीसाठी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी औरंगाबादेत
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया ३ डिसेंबर रोजी होणार असून यासाठी विभागातील सर्व जिल्हाधिकारी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून औरंगाबादेत उपस्थित राहणार आहेत.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, परभणीचे जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर, हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, नांदेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोस्टल बॅलेट मतमोजणी टेबल क्रमांक - १ साठी जालन्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांची तर टेबल क्रमांक - २ साठी औरंगाबादचे अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांची नियुक्ती केली आहे. मोजणी पर्यवेक्षक म्हणून ५६ अधिकाऱ्यांची तर राखीव मोजणी पर्यवेक्षक म्हणून २४ अधिकारी नेमले आहेत. मोजणी सहायक म्हणून १६८ तर राखीव मोजणी सहायक म्हणून २२ अधिकारी-कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.