शहरं
Join us  
Trending Stories
1
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
2
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
3
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
4
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
5
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
6
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
7
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
8
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
9
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
10
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
11
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
12
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
13
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
14
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
15
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
17
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
18
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
19
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
20
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

डाव्या कालव्याला पाणी सोडले

By admin | Updated: May 19, 2014 01:08 IST

तीर्थपुरी: जायकवाडी पाटबंधारे विभागातर्फे नाथसागरातून पैठण डाव्या कालव्यात ३०० क्युसेक्स पाणी पिण्यासाठी सोडण्यात आले.

 तीर्थपुरी: जायकवाडी पाटबंधारे विभागातर्फे नाथसागरातून पैठण डाव्या कालव्यात ३०० क्युसेक्स पाणी पिण्यासाठी सोडण्यात आले. ज्या ठिकाणी पाणी साठवन करता येते त्या ठिकाणी पाणी अडवले जाणार असल्याने त्या भागातील विहिरीची पाणी पातळी वाढणार आहे. जायकवाडी पाटबंधारे विभागाने पैठण डाव्या कालव्यात १५ मे रोजी रात्री पाणी सोडले. हे पाणी तीर्थपुरी पर्यंत आले आहे. पैठण, अंबड, घनसावंगी, पाथरी, परतूर, मानवत, परभणी आदी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली. डाव्या कालव्याच्या पाण्यामुळे परिसरातील विहिरीच्या पाणी पातळीत वाढ होणार, तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मिटणार आहे. त्यामुळेच परिसरातील शेतकर्‍यांनी कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती. तसेच पालकमंत्री राजेश टोपे यांनी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. ती मान्य करून जायकवाडी पाटबंधारे विभागाला तटकरे यांनी पाणी सोडण्याबाबत सुचना दिली होती. ‘लोकमत’ नेही याबाबत वृत्त प्रकाशित केले होते, त्याची दखल घेवून हे पाणी सोडण्यात आले. प्रत्येक ठिकाणी साठवणार पाणी पैटण डाव्या कालव्यावर ज्या ठिकाणी कॅनल मध्ये ज्या ठिकाणी पाणी साठवता येते अशा डाव्या कालव्यावरील गोपेवाडी, विहामांडवा, वडीगोद्री, तीर्थपुरी, आष्टी दरम्यान पाणी सोडण्यात येणार असून पाणी साठविणार असल्याचे शाखा अभियंता भागवत मापारी यांनी सांगितले. या ठिकाणी अडीच मीटर उंच तर पाच ते सहा किमी लांब असे पाणी साठविले जाणार आहे. त्यामुळे त्या भागातील पाणी पातळीत वाढ होण्यास मदत मिळणार आहे.१२२ किमी पाणी गेल्यास २०० क्युसेक्स पाणी जास्तीचे सोडण्यात येणार आहे. एकूण ५०० क्युसेक्स पाणी अतिरिक्त सोडण्यात येणार आहे. (वार्ताहर)