आकड्यांचा खेळ शिका, यशस्वी बना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 01:32 IST2017-12-03T01:32:04+5:302017-12-03T01:32:09+5:30
शेअर मार्केट आणि अंकशास्त्र, या दोन्ही गोष्टी आकड्यांशी संबंधित आहेत. आकड्यांचा हा खेळ व्यवस्थित शिकून घेतला तर यश, पैसा, कीर्ती या सर्व गोष्टी आपसुकच तुमच्याकडे चालत येतील, अशा शब्दांत शेअर बाजार आणि अंकशास्त्र विषयातील तज्ज्ञ शीतल बाखरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले

आकड्यांचा खेळ शिका, यशस्वी बना
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शेअर मार्केट आणि अंकशास्त्र, या दोन्ही गोष्टी आकड्यांशी संबंधित आहेत. आकड्यांचा हा खेळ व्यवस्थित शिकून घेतला तर यश, पैसा, कीर्ती या सर्व गोष्टी आपसुकच तुमच्याकडे चालत येतील, अशा शब्दांत शेअर बाजार आणि अंकशास्त्र विषयातील तज्ज्ञ शीतल बाखरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि कमीत कमी गुंतवणुकीत अधिकाधिक परतावा देण्याचा राजमार्ग समजावून सांगितला.
सखी मंच आणि प्रिव्हिलेज मंच यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमत हॉल येथे शनिवारी सायंकाळी शीतल बाखरे यांच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेअर बाजाराविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, कुणाच्याही सांगण्यावरून शेअर बाजारात पैसा गुंतवू नका.
या क्षेत्राचा थोडा अभ्यास करा आणि आजच्या महागाईच्या काळात अधिकची मिळकत म्हणून दरमहा कमीत कमी वीस ते पंचवीस हजार हमखास कमवा. कमीत कमी गुंतवणुकीत अमाप पैसा मिळवून देणारे हे क्षेत्र आहे. मात्र त्यासाठी मूलभूत माहिती आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.
डीमॅट अकाऊंट, म्युच्युअल फंड, इक्विटी, पोर्टफोलियो मॅनेजमेंट, स्टॉक मार्र्केट, आॅनलाइन ट्रेडिंग यासारख्या गोष्टींची बाखरे यांनी सविस्तर माहिती दिली.