शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालय इमारतीला गळती

By admin | Updated: August 8, 2016 00:40 IST

उस्मानाबाद : तहसील कार्यालयासाठी उभारण्यात आलेल्या इमारतीला गळती लागली आहे. गळती थांबविण्यासाठी तहसील प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम

उस्मानाबाद : तहसील कार्यालयासाठी उभारण्यात आलेल्या इमारतीला गळती लागली आहे. गळती थांबविण्यासाठी तहसील प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही अद्याप दुरूस्ती झालेली नाही. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे.तहसील कार्यालयासाठी इमारत उभारून काही वर्षांचाच कालावधी लोटला आहे. असे असतानाच सदरील इमारतीच्या छताला गळती लागली आहे. पाऊस सुरू असताना अक्षरश: कार्यालयामध्ये पाण्याचा ढव साचतो. त्यामुळे अशा कार्यालयात बसून कर्मचाऱ्यांना काम करणे कठीण झाले आहे. तसेच काही महत्वाच्या संचिकाही या पाण्यामुळे भिजल्या आहेत. फर्निचरचेही नुकसान होत आहे. कार्यालयात सातत्याने पाणी साचून राहात असल्याने दुर्गंधीयुक्त वातावरण असते. दरम्यान, सदरील कार्यालयाची गळती थांबविण्याबाबत (दुरूस्ती करणे) तहसील प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरवा करण्यात येत आहे. तसेच पत्रव्यवहारही सुरू आहे. परंतु, बांधकाम विभागाने सदरील पत्राला केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे अर्धाअधिक पावसाळा सरत आला असतानाही तहसील कार्यालय इमारतीची गळती रोखण्यात आलेली नाही. अशा कार्यालयात बसून कामकाज करणे कठीण झाले असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. बांधकाम विभागाच्या या दुर्लक्षित कारभाराचा फटका येथील कर्मचाऱ्यांसोबतच बाहेरगावाहून कामानिमित्त येथे येणाऱ्या नागरिकांनाही सोसावा लागत आहे. त्यामुळे सदरील इमारतीची गळती रोखण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला मुहूर्त मिळणार कधी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)