शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
2
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
3
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
5
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
6
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
7
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
8
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
9
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
10
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
12
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
13
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
14
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
15
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
16
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
17
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
18
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
19
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
20
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या इमारतीला गळती

By admin | Updated: September 12, 2014 00:07 IST

नांदेड : जिल्हा व सत्र न्यायालयाची बांधण्यात आलेली नवीन इमारत ठिकठिकाणी गळत असून या इमारतीच्या खोल्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे.

नांदेड : जिल्हा व सत्र न्यायालयाची बांधण्यात आलेली नवीन इमारत ठिकठिकाणी गळत असून या इमारतीच्या खोल्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे न्यायालयीन कामकाज करणाऱ्यांना येथे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी कामाचा दर्जा पहिल्याच पावसात उघडकीस आला.बांधकाम विभागाने जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात नव्याने न्यायालयाची व न्यायाधिशांच्या निवासाकरीता वसाहतीचे बांधकाम केले. या बांधकामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून नव्याने बांधण्यात आलेल्या खोल्यांमधील भिंतीतून पाणी पाझरत आहे. तसेच खोल्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. या इमारतीकरीता राज्य शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. तळमजल्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचले असून याबाबत येथे नियुक्त असलेल्या बांधकाम विभागाच्या निरीक्षकांशी प्रस्तूत प्रतिनिधीने चर्चा केली असता ते म्हणाले, जिल्हाधिकारी साहेबांकडे तळमजल्यावरच्या विकासाचा आराखडा प्रलंबित आहे. त्यांची परवानगी न मिळाल्याने येथील अशी परिस्थिती आहे. न्यायालयाच्या प्रांगणाचा विकास व्हावा व हा परिसर सुशोधित करण्यात यावा, अशी मागणी न्यायालय प्रशासनाने बांधकाम विभागाकडे अनेक वेळा केली. जिल्ह्यातील सर्वच कार्यालयांच्या परिसराचा कायापालट गुरु-ता-गद्दी त्रिशताब्दी महोत्सवाच्या निधीतून करण्यात आला.परंतु न्यायालयाच्या इमारतीचा या निधीत समावेश का केला गेला नाही, असा प्रश्न येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पडतो आहे. (प्रतिनिधी)