शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

नेतेमंडळींची आकडेमोड सुरू

By admin | Updated: October 17, 2014 00:27 IST

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर तुळजापूर, उस्मानाबाद-कळंबसह चारही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांसह पदाधिकारी,

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर तुळजापूर, उस्मानाबाद-कळंबसह चारही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मतांची आकडेमोड सुरू केली आहे़ मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या बुधवारी दिवसभर प्रत्यक्ष भेटी घेण्यासह भ्रमणध्वनीवरून माहिती संकलित करण्यात येत आहे़ तर काही उमेदवार घरगुती कामानिमित्त बाहेरगावी गेले होते़ तुळजापूर विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे पंचरंगी लढत पहावयास मिळाली़ राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजपाच्या मातब्बर नेतेमंडळींनी तुळजापूरातच सभा घेतल्याने तुळजापूर विधानसभा मतदार संघाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष वेधले आहे़ राष्ट्रवादीचे उमेदवार जीवन गोरे सकाळी तुळजापूर येथील एका घरगुती कार्यक्रमास हजेरी लावली़ दुपारनंतर पदाधिकाऱ्यांची चर्चा करून मतदानाबाबत चर्चा केली़ काँग्रेसचे उमेदवार मधुकराव चव्हाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रियेनंतर आकडेमोडीस सुरूवात केली आहे़ पदाधिकाऱ्यांशी अणदूर, तुळजापूर येथे त्यांनी चर्चा केली आहे़ तर गुरूवारी कौटुंबिक कामानिमित्त ते बाहेरगावी गेल्याचे सूत्रांनी सांगितले़ शिवसेनेचे उमेदवार सुधीर पाटील यांनी पदाधिकाऱ्यांनीशी मतदान प्रक्रियेवर चर्चा केली असून, पाटील हे बुधवारी कौटुंबिक कारणास्तव सोलापूर येथे गेल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले़ तर भाजपाचे उमेदवार संजय निंबाळकर यांनी गुरूवारी सकाळी उस्मानाबादसह तुळजापूर शहरातील पदाधिकाऱ्यांशी मतदानप्रक्रियेबाबत वार्तालाप केला़ तसेच मनसेचे उमेदवार देवानंद रोचकरी यांनीही मतदार संघातील पदाधिकाऱ्यांशी मतदान प्रक्रियेबाबत चर्चा केली़उस्मानाबाद-कळंब मतदार संघातही असेच चित्र पहावयास मिळाले़ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी सकाळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून चर्चा केली़ त्यानंतर सोलापूर येथे रूग्णालयात असलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेवून तब्येतीची विचारपूस केली़ सोलापूरला जाताना रस्त्यावरील गावामध्ये थांबून दोन्ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली़ शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी दिवसभरात पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत चर्चा केली़ काँग्रेसचे उमेदवार विश्वास शिंदे यांनी सकाळी शहरासह परिसरातील पदाधिकाऱ्यांशी उस्मानाबाद येथे बोलावून मतदान प्रक्रियेबाबत चर्चा केली़ शिवाय पुढील राजकीय बाबींवरही पदाधिकाऱ्यांना माहिती दिली़ तसेच भाजपाचे उमेदवार संजय दूधगावकर यांनी तडवळासह परिसरातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली़ दुपारनंतर कळंब तालुक्यातील खामसवाडी व परिसरातील पदाधिकाऱ्यांची भेट घेवून मतदान प्रक्रियेबाबत चर्चा केली़ एकूणच मतदान प्रक्रिया झाल्याने उमेदवारांसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आकडेमोड करताना दिसत आहेत़ आकडेमोडीनंतर अंदाज वर्तविण्यात येत असले तरी रविवारी होणाऱ्या मतमोजणीनंतरच मतदारांचा कौल समोर येणार आहे़ (प्रतिनिधी)भूम : भूम-परंडा-वाशी मतदार संघातील सर्वपक्षीय उमेदवारांनी मतदान प्रक्रियेनंतर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आकडेमोडीस सुरूवात केली आहे़ याच अनुषंगाने बुधवारी दिवसभर पदाधिकाऱ्यांसह मतदारांशी संपर्क साधून चर्चा करण्यावर भर दिला़ राष्ट्रवादीचे राहुल मोटे, शिवसेनेचे ज्ञानेश्वर पाटील व भाजप-रासपाचे उमेदवार बाळासाहेब पाटील या तिघांनीही पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मतदानाच आकडेमोड केली़ तसेच मतदार संघातील मतदारांशी चर्चा करून माहिती घेतली़