शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

‘अवकाळी’चा कहर सुरूचं

By admin | Updated: April 14, 2015 00:43 IST

उदगीर व देवणी तालुक्यात रविवारी रात्री धो-धो पाऊस बरसला़ दिवसा कडक उन्हं अनुभवल्यानंतर रात्री अनपेक्षितपणे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला

उदगीर व देवणी तालुक्यात रविवारी रात्री धो-धो पाऊस बरसला़ दिवसा कडक उन्हं अनुभवल्यानंतर रात्री अनपेक्षितपणे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला नागरिक सामोरे गेले़ पावसातील वाऱ्यामुळे अनेकांची पत्रे उडाली़ तर आनंदवाडीत वीज पडून एक म्हैैस गतप्राण झाली़ सोमवारी दुपारी पुन्हा देवणी परिसराला पावसाने झोडपले़ वलांडी भागात तर लहान आकाराच्या गाराही पडल्या़रविवारी रात्री तासभर वारे व रिमझिम कोसळल्यानंतर १० वाजण्याच्या सुमारास मात्र तुफान पाऊस सुरु झाला़ पावसात वारेही सुरु असल्याने अनेकांचे पत्रे उडाले़ दुकान, हॉटेल्ससमोरील निवारेही उडून गेले़ देवणी व परिसरात तब्बल सव्वा तासापेक्षा जास्त वेळ जोरदार पाऊस झाला़ रात्री ११़३० वाजण्याच्या सुमारास पावसाने उसंत घेतली़ या पावसामुळे नदी-नाल्यांतील डबक्यांमध्ये, रस्त्याशेजारी पाणी साचले आहे़ वलांडी : देवणी तालुक्यातील वलांडी परिसरात रविवारी रात्री जोरदार पाऊस झाला़ सोसाट्याचा वारा अन् चमकणाऱ्या विजांमुळे नागरिक भयभीत झाले होते़ रात्री सुरु झालेला पाऊस सलग तासभर पडला़ दरम्यान, सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पावसाने पुन्हा हजेरी लावली़ यावेळी लहान आकाराच्या गाराही बरसल्या़हाळी हंडरगुळी : मागील चार-पाच दिवसांपासून हाळी हंडरगुळी परिसरात सातत्याने वादळी वारे, विजांचा कडकडाट अन् अवकाळी पाऊस सुरु आहे़ नियमितपणे दुपारी चार वाजेनंतर वातावरणात बदल होऊन पाऊस सुरु होत आहे़ रविवारी मध्यरात्री बरसलेल्या पावसात वाऱ्यामुळे बाबा शेख, शिवशंकर गोरे यांच्यासह नागरिकांच्या घरावरील पत्रे उडाली़ काही नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी घुसले़ निटूर : निटूर व परिसरात रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला़ या पावसामुळे आंब्याला लागलेल्या कैऱ्या पूर्णपणे गळून पडल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला आंबा निघून गेल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे़ निटूर परिसरातील शेंद, मुगाव, मसलगा, ढोबळेवाडी, डांगेवाडी, उजेड, कलांडी, ताजपूर, बुजरुकवाडी, बसपूर, खडकउमरगा आदी गावांमध्ये आंब्यांची झाडे मोठ्या संख्येने आहेत़ रविवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे अंगद निटूरे, आत्माराम माळी, बाबुराव तत्तापूरे, पंकज कुलकर्णी आदी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे़ नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)