शहरं
Join us  
Trending Stories
1
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
2
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
3
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
4
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
5
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
6
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
9
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
10
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
11
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
12
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
13
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
14
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
15
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
16
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
17
Apple च्या CEO पदी नियुक्ती; कोण आहेत जॉन टर्नस? टिम कुक यांची जागा घेणार...
18
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
19
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यामध्ये गणेशमूर्तींचे काम अंतिम टप्प्यात

By admin | Updated: August 24, 2014 00:36 IST

प्रसाद आर्वीकर, परभणी जिल्ह्याला गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत़

प्रसाद आर्वीकर, परभणीजिल्ह्याला गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत़ हा उत्सव एक आठवड्यावर येऊन ठेपल्याने मूर्तीकार मंडळींची लगबग सुरू झाली असून, गणेश मूर्तीवर अखेरचा हात फिरविण्यात कारागीर मग्न आहेत़ दरवर्षी जिल्ह्यात गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो़ गणेशोत्सवानंतर गौरींचे आगमन होते आणि सणाला प्रारंभ होतो़ गणेशोत्सवाची धामधूम औरच असते़ या उत्सवाच्या निमित्ताने बालगोपाळांपासून युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण असते़ यावर्षी २९ आॅगस्ट रोजी श्रींची स्थापना होत आहे़ १० दिवस हा उत्सव चालणार असून, यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते़ गणेश मंडळांची नोंदणी आता सुरू झाली आहे़ धर्मादाय आयुक्त कार्यालयांमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी केली जाते़ त्याचप्रमाणे नजिकच्या पोलिस ठाण्यामध्ये देखील मंडळाची नोंदणी करावी लागते़ गणेश मंडळांचे पदाधिकारी नोंदणीचे काम करण्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालय आणि पोलिस स्थानकांमध्ये गर्दी करीत आहेत़ दुसरीकडे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी शहरातील बाजारपेठ सजू लागली आहे़ गणेशोत्सवासाठी लागणारे आराशीचे साहित्य तसेच पुजेसाठी लागणारे साहित्य बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे़ आठवडा बाकी असून, तयारी मात्र आतापासूनच सुरू झाली आहे़