शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भविष्य निर्वाह निधीचा हप्ता अखेर जमा

By admin | Updated: April 16, 2016 01:35 IST

सेनगाव : तालुक्यात सहाव्या वेतन आयोगातील प्राथमिक शिक्षकांचा भविष्य निर्वाह निधीचा पाचवा हप्ता पंचायत समितीच्या दुर्लक्षामुळे गेल्या आर्थिक वर्षात वेळेवर देयके

सेनगाव : तालुक्यात सहाव्या वेतन आयोगातील प्राथमिक शिक्षकांचा भविष्य निर्वाह निधीचा पाचवा हप्ता पंचायत समितीच्या दुर्लक्षामुळे गेल्या आर्थिक वर्षात वेळेवर देयके मंजूर न केल्याने परत गेला होता. या प्रकरणी ‘लोकमत’चे वृत्त प्रकाशित होताच प्रलंबित भविष्य निर्वाह निधीची २६ लाख ५० हजार रुपये निधी उपलब्ध झाला असून शिक्षकांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया चालू आहे.सहाव्या वेतन आयोगातील प्राथमिक शिक्षकांचा पाचवा हप्ता व केंद्रप्रमुखांच्या दुसरा हप्त्याची देयके येथील पं.स.ने मंजूर केली आहेत. त्यामध्ये प्राथमिक शिक्षकांची २६ लाख ५० हजार तर केंद्रप्रमुखांची तीन लाख ७० हजार रुपयाची देयके मंजूर केली. संबंधीताच्या भविष्य निर्वाह निधी खात्यावर जमा करण्यासाठी धनादेश सेनगाव पं.स.च्या लेखा विभागाने मुख्य लेखा विभाग यांच्याकडे पाठविला आहे. गतवर्षी शिक्षकांच्या पाचव्या हप्त्यासाठी निधी उपलब्ध झाला होता. परंतु निर्धारित वेळेत देयके गटविकास अधिकारी स्तरावर प्रस्ताव मंजूर झाले नसल्याने निधी परत गेला होता. यामुळे शिक्षकवर्गात नाराजी होती. या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच तो निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रलंबित रक्कम उपलब्ध केल्याबद्दल शिक्षक संघटनेने गटविकास अधिकारी बी.एस. पाचपाटील, सहाय्यक लेखा अधिकारी बंडाळे यांचा सत्कार केला. यावेळी विजय राठोड, शिवलिंग साखरकर, श्रीराम महाजन, के.बी. डांगे, रामेश्वर चोपडे, पी.एन. पोपळघट, विलास आधळे, राहुल लव्हडे, शेख हबीब, के.एन. काळे, एल.वाय. भालेराव, आर.एन. गिरी, बी.टी. काळे, गजानन गोरे, प्रकाश बोरुडे, गजानन मुळे, गजानन पत्की, व्ही.एम. जाधव, ओ. वाय. कोटकर, रमेश भिंगे, जगन्नाथ खिराडे, आर.पी. खिल्लारे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)