शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
3
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
4
Mithilesh Tiwari: बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
5
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
6
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
7
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
8
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
9
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
10
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
11
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
12
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
13
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
14
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
15
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
16
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
17
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
18
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
19
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांपासून शेतरस्ता मिळेना

By admin | Updated: July 24, 2014 00:24 IST

दैठणा : परभणी तालुक्यातील आंबेटाकळी येथील दोन शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी तब्बल दहा वर्षांपासून रस्ताच मिळत नाही.

दैठणा : परभणी तालुक्यातील आंबेटाकळी येथील दोन शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी तब्बल दहा वर्षांपासून रस्ताच मिळत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेतामध्ये जाता येत नसल्यामुळे कुटुंंंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
आंबेटाकळी येथील अशोक मधुकर बेले व बालासाहेब मधुकर बेले या दोन शेतकऱ्यांचा २००५ पासून शेतातील रस्ता बंद करण्यात आला होता. परभणीचे तहसीलदार यांच्याकडे या शेतकऱ्यांनी लेखी तक्रार केल्यानंतर गट क्रमांक ५२ व ५३ या सामूहिक धुऱ्यावरून रस्ता देण्याचा आदेश तहसीलदारांनी दिले होते. मात्र माणिक विठ्ठल बेले, मारोतराव पुरभाजी बल्लाळ यांनी या रस्त्यावरून जाण्याची मनाई केली. औरंगाबाद आयुक्तालय यांना तक्रार करण्यात आली. या तक्रारीची चौकशी करून आयुक्तालयाने तहसीलदारांना कोर्ट अ‍ॅक्ट कलम ०५ प्रमाणे गट क्रमांक ५२ व ६१ या सामायिक रस्त्याने रस्ता देण्यात यावा, असा आदेश देण्यात आला. मात्र या आदेशाची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही. याबाबत दैठणा पोलिस ठाण्यात लेखी तक्रार करण्यात आली, परंतु या तक्रारीली केराची टोपली दाखविण्यात आली आहे. त्यामुळे दहा वर्षे उलटूनही या दोन शेतकऱ्यांना शेतातून जाण्यासाठी रस्ता मिळाला नाही. याचे सोयरसूतक तहसीलदार व पोलिस प्रशासनाला नसल्याचे दिसून येत आहे. अशोक मधुकर बेले यांची पाच एकर तर बालासाहेब बेले यांची ६ एकर जमीन शेतात जाता येत नसल्यामुळे पडीक राहिली आहे. त्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
शेतरस्त्यावरून होत आहेत भांडणे
जिल्ह्यात दरवर्षी शेत रस्त्यावरून अनेकांची भांडणे होत आहेत. शासन स्तरावरून शेत जमिनीची मोजणी स्वातंत्र्यानंतर एकदाच झाली आहे. त्यामुळे शेतरस्ते अंदाजे काढण्यात आली आहेत. परंतु आता शेतीचे क्षेत्र कमी झाल्याने काही शेतकरी शेतरस्ते देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये कसे जावे? असा गहण प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच शेतासाठी जाणाऱ्या शिवरस्त्यावर शेतकऱ्यांनी अतिक्रमणे केली आहेत. याकडे तहसीलदारांचे दुर्लक्ष होत आहे.