शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचा २९ वर्षांपासून वाद, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना हल्लेखोरांची दादागिरी अन् हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:49 IST

आरोपींचे दुकान अनधिकृत, माजी सरपंच दादा सांडू पठाण यांच्या नातेवाइकांचा आरोप, काही वेळ रस्ता रोको

छत्रपती संभाजीनगर : ज्या जमिनीच्या वादातून जटवाडा रस्त्यावरील ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांडू पठाण (६८) यांची हत्या झाली, तो वाद गेल्या २९ वर्षांपासून सुरू आहे. पोलिस ठाण्यातील तक्रारीशिवाय याच जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट आहे, तरीही हल्लेखोरांनी पठाण यांच्या हत्येपर्यंत मजल मारली. यात हर्सूल पोलिसांनी गुरुवारी पहाटेपर्यंत एकूण चार आरोपींना अटक करत न्यायालयात हजर केले.

एके काळी ओव्हरगावचे सरपंच राहिलेल्या दादा पठाण यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या जमिनीवरून गावातीलच एका कुटुंबासोबत त्यांचा वाद सुरू आहे. दादा पठाण मालक असलेल्या जागेवर त्या कुटुंबाने दावा करून त्रास देत होते. जमिनीलगतच्या रस्त्यावरून सुरू झालेला वाद कालांतराने पूर्ण जमिनीबाबत झाला. यातून त्यांच्यात अनेकदा वाद झाले. बुधवारी दुपारी पठाण जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी गेल्याचे समजल्यानंतर इम्रान खान मोईन खान पठाण, जमीर इनायत खान पठाण, मोसीन मोईन खान पठाण, अफरोज खान गयाज खान पठाण, असलम ऊर्फ गुड्डू खान गयाज खान पठाण, हैदर खान गयाज खान पठाण, समीर खान जमीर खान पठाण, उमेर खान जमीर खान पठाण, फुरकान खान अजगर खान पठाण, रामवतार सगरमल साबू व मोईन इनायतखान पठाण यांनी मिळून त्यांच्या मुलासह त्यांच्यावर हल्ला केला. यात दादा पठाण यांचा मृत्यू झाला, तर दोन मुले गंभीर जखमी झाले.

१९९६ पासून जमीन वादग्रस्तपठाण आणि आरोपींमध्ये ज्या जमिनीवरून वाद सुरू आहे, ती जमीन १९९६ पासून वादग्रस्त आहे. याच वादातून अनेकदा पोलिसांकडे तक्रार दाखल आहेत. शिवाय, दोन्ही गट न्यायालयात देखील गेले. सध्याही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्येच्या चार दिवस आधी याप्रकरणातून अदखलपात्र गुन्हा दाखल करून २४ तासांत आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती.

आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडीहर्सूल ठाण्याच्या पोलिस निरीक्षक स्वाती केदार, सहायक निरीक्षक सचिन सदाफुले, उपनिरीक्षक गणेश केदार यांनी घटनेनंतर हल्लेखोरांचा शोध सुरू केला. गुरुवारी पहाटेपर्यंत इम्रान खान मोईन खान पठाण, अफरोज खान गयाज खान पठाण (४२), समीर खान जमीर खान पठाण (३२), उमेर खान जमीर खान पठाण (२७) यांच्या मुसक्या आवळल्या. दौलताबाद व आसपासच्या परिसरात ते लपून बसले होते. न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, उर्वरित सहा हल्लेखोरांसाठी गुन्हे शाखेसह हर्सूल पोलिसांचे पथक जिल्ह्यात विविध ठिकाणी तपास करत होते.

आरोपींचे दुकान अनधिकृत, पाडण्यासाठी रस्ता रोकोदादा पठाण यांची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांनी त्यांच्याच घरासमोर फरसाण व मिठाईचे दुकान थाटले होते. हे दोन्ही दुकाने अनधिकृत असून ते तत्काळ पाडण्यासाठी पठाण यांचे संतप्त नातेवाईक, मित्र परिवाराने गुरुवारी दुपारी १ वाजता ओव्हरगावमध्येा आंदोलन केले. दुकान पाडेपर्यंत व सर्व आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली. पोलिसांनी धाव घेत समजून घातल्यानंतर आंदोलन मागे घेऊन दादा पठाण यांच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : 29-year land dispute ends in murder; attackers' aggression prevails.

Web Summary : A 29-year land dispute led to the murder of ex-Sarpanch Dada Pathan. Despite court proceedings, attackers killed Pathan, injuring his sons. Police arrested four suspects. The victim's family protested unauthorized shops owned by the accused, demanding their demolition and further arrests.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर