शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

माकणी धरणामध्ये उरला अत्यल्प साठा

By admin | Updated: July 7, 2014 00:13 IST

उमरगा : गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील ७२ हजार हेक्टर क्षेत्रावरील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

उमरगा : गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील ७२ हजार हेक्टर क्षेत्रावरील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. यामुळे तालुक्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, चारा-पाण्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. माकणी धरणामध्ये केवळ १३ दलघमी इतका साठा उरला आहे.तालुक्याची पावसाची सरासरी ९५० मिमी असून, आतापर्यंत केवळ वीस मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे खरीप पेरणीची सर्वच यंत्रणा कोलमडली आहे. उष्णतेची दाहकता कायम असल्याने तालुक्यातील विहिरी, विंधन विहिरींच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. तालुक्यातील पाझर तलाव, साठवण तलावातील पाणी आटल्याने पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. खरीप पेरणीसाठी खते व बी-बियाणे खरेदी करावयाची असल्याने शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाचा डोंगर वाढत चालला असून, या रकमा आता कुठून द्यायच्या, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. काही शेतकऱ्यांनी उधारीवर खते, बियाणांची खरेदी करून ठेवली असून, यासाठीही व्यापाऱ्यांनी तगादा सुरू केला आहे. खरिपाच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या किराणा, भुसार, कापड दुकानदारांची थकबाकीही वाढल्याने शेतकऱ्यांची बाजारातील पत संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे. शिवाय चांगला पाऊस पडेल, या आशेवर व्यापाऱ्यांनीही बी-बियाणे, खते यासाठी लाखो रूपयांची गुंतवणूक केली. परंतु, हे साठे अद्यापही दुकानात तसेच पडून असल्याचे व्यापारी लक्ष्मीकांत माणिकवार यांनी सांगितले. चारा-पाण्याचा प्रश्न गंभीरपावसाने ओढ दिल्याने जलस्त्रोत कोरडे पडत आहेत. मागील दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या कडब्याचे मोठे नुकसान झाले असून, यामुळे पशुधनांना जगविण्यासाठी शिवारात चारा-पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. आतापासून शेतकऱ्यांना प्रती पेंडी वीस रूपये दराने विकतची वैरण घेऊन आपल्या पशुधनाला जगविण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे. (वार्ताहर)७२ हजार हेक्टरवरील पेरणी खोळंबलीउमरगा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी धरणात सध्या १३ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून, या धरणाची ५९८.५० इतकी पाणी पातळी आहे. वाढत्या उष्णतेमुळे व होणाऱ्या बाष्पीभवन व पाणी वापरामुळे या धरणातील पाणी पातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होत चालली आहे. येत्या महिनाभरात धरण भरण्याइतपत पाऊस पडलाच नाही तर उमरगा शहरासह भूकंपग्रस्त ५२ गावांचा पाणीपुरवठा गंभीर होण्याची शक्यता असल्याचे शाखा अभियंता अनिल मुळे यांनी सांगितले. दरम्यान, उमरगा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी, कोळसूर, कोरेगाव, तुरोरी या धरणातील पाणीसाठेही कमी होत असल्याने उमरगा शहराला आतापासूनच आठ दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा करण्यात येत आहे.चाळीस गावांतील लोकांना टंचाईचे चटकेतालुक्यात ९६ पैकी ४० गावांत सध्या टंचाईची परिस्थिती आहे. चिंचोली (ज) येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, इतर ठिकाणाहूनही पंचायत समितीकडे अधिग्रहणाचे प्रस्ताव दाखल झाले आहेत.