शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

२०० अंगणवाड्यांना इमारतींचा अभाव

By admin | Updated: June 20, 2014 00:13 IST

सुनील चौरे , हदगाव तालुक्यातील २८२ व नवीन १४ अंगणवाड्यांपैकी फक्त ८८ अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीत भरतात़ तर २०८ अंगणवाड्यांना इमारतच नाही़

सुनील चौरे , हदगावतालुक्यातील २८२ व नवीन १४ अंगणवाड्यांपैकी फक्त ८८ अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीत भरतात़ तर २०८ अंगणवाड्यांना इमारतच नाही़ आता पावसाळ्यात या अंगणवाड्या बंद असतात़ किंवा मग मोडकळीला आलेल्या जि़ प़ शाळांत, अंगणवाडी ताईच्या घरीच भरविल्या जातात़ ही समस्या ३० वर्षांपासून आहे़एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे मुलभूत उद्दिष्ट सहा वर्षाखालील बालके, गर्भवती व स्तनदा माता याचे आरोग्य व पोषण स्थिती सुधारण्यासाठी तसेच शालेयपूर्व श्क्षिणास उत्तेजन देण्यासाठी मुलभूत सेवा पुरविणे हे आहे़ या सेवा म्हणजे लसीकरण, पुरक पोषण आहार, आरोग्य तपासणी संदर्भ सेवा, पोषण व आरोग्य श्क्षिण आणि शालेय पूर्व शिक्षण होय़ ही योजना गावपातळीवर राबविली जाते़यासाठी ५५३ मंजूर बालविकास प्रकल्प असून या बालविकास प्रकल्पासाठी ३६४ ग्रामीण, १०४ नागरी व ८५ आदिवासी क्षेत्रात आहेत़ जिल्हा वार्षिक योजना, बीआरजीएफ, ग्रामीण पायाभूत विकास अंतर्गत अंगणवाडीच्या बांधकामासाठी निधी येत असतो़इ़स़२००९-१०, २०१०-११, २०११-१२, २०१२-१३ या चार वर्षात ८८ अंगणवाडी इमारतीची कामे सुरू झाली असून त्यापैकी फक्त ७० अंगणवाड्यांची कामे पूर्ण झाली असून १८ अंगणवाड्या अद्याप अपूर्णच आहेत़ या अंगणवाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाच नाही़ २८२ अंगणवाड्यांपैकी एकाही अंगणवाडीत वीजजोडणी नाही़ ३० वर्षांपासून अंगणवाड्या मोडकळीस आलेल्या जि़प़शाळा, समाजमंदिर, किंवा अंगणवाडी ताईच्या घरीच भरतात़ तालुक्यात २७८ अंगणवाड्या सध्या सुरू आहेत़ यामध्ये २५ हजार ९७८ विद्यार्थी शालेय पूर्व शिक्षणाची तोंडओळख करून घेतात़ सर्व शिक्षण अभियानांतर्गत अडगळीच्या ठिकाणी वाडी-तांड्यावर शाळेच्या इमारती १० वर्षात शेकडो उभ्या राहिल्यात़ परंतु अंगणवाडीची उपेक्षा संपता संपेना़ चार-पाच वर्षाला प्रत्येक गावात नवीन अंगणवाडीला मान्यता मिळते़ एका सर्कलच्या गावात ५ ते १० अंगणवाड्याची संख्या झाली़ १ हजार लोकसंख्यावरून ५०० लोकसंख्येला एक अंगणवाडी मंजूर झत्तली़ सुरूही झाली़ परंतु स्वत:चे छत मात्र त्यांच्या वाट्याला आले नाही़ ज्या वयात स्वच्छतेचे धडे गिरविले जातात, त्यांना मात्र उकिरड्यावर, उघड्यावर पोषक आहार दिला जातो़ वर्षातील आठ महिने ठीक आहे़ तेवढ्या अडचणी येत नाहीत़ परंतु पावसाळ्यात कुठे बसायचे, अंगणवाडीत कसे गायचे, हा प्रनच आहे़ अनेक गावांत किरायाने खोल्या मिळत नाही़ जिथे मिळतात त्यांना शासन नियमाने अत्यल्प किराया वर्षाला, दोन वर्षाला मिळतो़ इ़स़२००९-१०, २०१०-११, २०११-१२, २०१२-१३ या चार वर्षात ८८ अंगणवाडी इमारतीची कामे सुरू झाली असून त्यापैकी फक्त ७० अंगणवाड्यांची कामे पूर्ण झाली असून १८ अंगणवाड्या अद्याप अपूर्णच आहेत़ या अंगणवाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थाच नाही़