शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
6
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
7
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
8
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
9
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
10
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
11
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
12
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
13
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
14
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
15
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
16
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
17
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
18
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
19
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
20
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

मागेल त्या मजुरांना आता काम मिळणार

By admin | Updated: December 14, 2014 00:05 IST

जालना : जिल्ह्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती असल्यामुळे टंचाई निवारण करण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत.

जालना : जिल्ह्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती असल्यामुळे टंचाई निवारण करण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना आखल्या आहेत. जिल्हा ते ग्रामीण स्तरावरील शासकीय यंत्रणांनी सतर्क राहून मग्रारोहयोतून मागेल त्याला काम व केलेल्या कामाचे दाम देऊन त्वरित नियोजन व उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिले.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत यंत्रणानिहाय अधिकाऱ्यांची आढावा बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. जिल्ह्यात अल्प पावसामुळे दुष्काळसदृष्य परिस्थिती असून याचा सामना करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत नवीन कामे सुरु करणे व स्थानिक मजूर दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरित होऊ नये तसेच पिण्याच्या पाण्यासंदर्भात नियोजन व उपाययोजना, मागेल त्याला काम या विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली.तसेच उपजिल्हाधिकारी डॉ. एन. आर. शेळके यांनी या संदर्भात जिल्ह्यात व सर्व तालुक्यातील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात दुष्काळ निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून मजूरांनी कामाची मागणी नोंदविण्यासाठी व कामे देण्यासाठी सदरील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही त्यांनी या बैठकीत नमूद केले. मजुरांना काम मिळण्यासाठी जॉबकार्ड असणे आवश्यक असून ज्या मजुरांना जॉबकार्डचे वाटप करण्यात आले नाही त्यांनी मागणी क्र. १ चा फॉर्म भरुन द्यावा. तालुका क्षेत्रात मग्रारोहयोची कामे सुरु करावयाची असल्यास तालुक्यातील तहसीलदारांमार्फत गटविकास अधिकाऱ्यांनी त्याची नोंदणी करुन त्याचे प्रस्ताव सादर करावेत. मग्रारोहयोअंतर्गतच्या सामुहिक मग्रारोहयो विहिरी, शेततळे, भू सुधारणा, गाव तलाव, नाला खोलीकरण, गाळ काढणे यासारख्या कामांचा आढावा तालुकानिहाय गटविकास अधिकारी व तहसीलदारांनी वेळोवेळी घ्यावा व मागणीनुसार एकही लाभार्थी या कामापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याबरोबरच याचा अहवाल जिल्हा प्रशासनास वेळोवेळी देण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.या बैठकीस जालन्याच्या उप विभागीय अधिकारी मंजुषा मुथा, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे, लघु सिंंचन विभागाचे कार्यकारी अभियंता, नगर पालिकांचे मुख्याधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) ४ज्या तलाव क्षेत्रात गाळसदृष्य जमिनीत ओलावा आहे व थोड्याफार प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे, त्या भागातील शेतकऱ्यांना चारा उत्पादनासाठी मोफत बी-बियाणे देण्यात यावीत. जेणेकरुन काही प्रमाणात काही होईना जनावरांसाठी चारा तयार करण्यास मदत होईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले.