‘लालपरी’ची भाडेवाढ, सर्वसामान्यांना फटका; पुण्याला १२५ रुपये, तर बीडला ३० रु. अधिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 17:19 IST2025-01-25T17:18:39+5:302025-01-25T17:19:38+5:30
सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी अशी ओळख असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी बसेसच्या तिकीट दरात १४.९७ टक्के वाढ

‘लालपरी’ची भाडेवाढ, सर्वसामान्यांना फटका; पुण्याला १२५ रुपये, तर बीडला ३० रु. अधिक
छत्रपती संभाजीनगर : ‘लालपरी’चा प्रवास आता महागला आहे. छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला जाण्यासाठी आता शिवनेरी बसने १२५ रुपये, शिवशाहीने ७५ रुपये आणि साध्या बसने ५५ रुपये जास्त मोजावे लागतील.
सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी अशी ओळख असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी बसेसच्या तिकीट दरात १४.९७ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, ही दरवाढ मध्यरात्रीपासूनच लागू करण्यात आली.
एसटीचे जुने आणि नवीन भाडे
मार्ग- पूर्वीचे भाडे - नवीन भाडे
- पुणे (साधी बस)- ३४० रु. -३९५ रु.
- पुणे (शिवशाही) - ५१५ रु - ५९० रु.
- पुणे (शिवनेरी बस)- ७५५ रु.- ८८० रु.
- नागपूर (शिवशाही) - १, ०८५ रु.- १,१९० रु.
- नागपूर (साधी बस) - ७३० रु.- ८४५ रु.
- नाशिक (साधी बस)- २९५ रु.- ३४५ रु.
- जळगाव (साधी बस) - २४५ रु.- २८० रु.
- मुंबई निमआराम बस- ७६० रु. ८७५ रु.
- वाशिममार्गे नागपूर (शिवशाही)- १,१४० रु.-१,२५० रु.
- वाशिममार्गे नागपूर (साधी बस)- ७६५ रु. -८८५ रु.
- यवतमाळ (साधी बस)-५५० रु.-६३५ रु.
-लातूर (साधी बस) - ४२० रु.-४८५ रु.
- सोलापूर (साधी बस)- ४८० रु.-५५५ रु.
- तुळजापूर (साधी बस)- ४१० रु.-४७५ रु.
- जालना (साधी बस) -९० रु. -१०५ रु.
- बीड (साधी बस) -२०० रु.- २३० रु.
- पुसद (साधी बस) -४२५ रु. - ४९० रु.