औरंगाबादेत शिवसेना नगरसेवक आत्माराम पवार यांच्यावर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 13:30 IST2018-10-30T13:22:19+5:302018-10-30T13:30:13+5:30
गजाननगर येथील शिवसेना नगरसेवक आत्माराम पवार यांच्यावर काही अज्ञात युवकांनी चाकू हल्ला केला.

औरंगाबादेत शिवसेना नगरसेवक आत्माराम पवार यांच्यावर चाकू हल्ला
औरंगाबाद : गजाननगर येथील शिवसेना नगरसेवक आत्माराम पवार यांच्यावर काही अज्ञात युवकांनी चाकू हल्ला केला. हल्ल्यात पवार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गजाननगर येथील शिवसेना नगरसेवक आत्माराम पवार यांच्या घरासमोर काल रात्री काही उनाड पोर जमली होती. तेव्हा त्यांना पवार यांनी समजावून सांगितले. यावेळी थोडी वादावादी झाली. यातूनच आज सकाळी पवार यांच्यावर हा हल्ला झाला असल्याची माहिती आहे. पवार सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच )