शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
4
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
5
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
6
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
7
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
8
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
9
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
10
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
11
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?
12
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
13
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
14
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
15
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
16
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
17
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
18
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
19
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
20
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ

जिवावर उठतेय पतंगबाजी; मांजामुळे दरवर्षी २०० पेक्षाही अधिक पक्ष्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 18:25 IST

Nylon Manjha नायलॉन मांजाची पतंगबाजी अनेक पक्षी आणि प्राण्यांच्या जिवावर उठली आहे.

ठळक मुद्देसाधा दोरा वापरून पतंगबाजीचा आनंद लुटापंख छाटले गेल्याने उडणे होते कायमचे बंद

औरंगाबाद : नायलॉन मांजाच्या मदतीने प्रतिस्पर्ध्याचा पतंग कापून ‘काटे......’ असा जोरात जल्लोष करणे खूप आनंददायी असते; पण त्याचवेळी कळत-नकळतपणे अनेक मुके जीव जखमी होतात, याचे अनेकांना भानही नसते. मांजात अडकून दरवर्षी २०० पेक्षाही अधिक पक्ष्यांना आणि प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे.

नायलॉन मांजाची पतंगबाजी अनेक पक्षी आणि प्राण्यांच्या जिवावर उठली आहे. त्यामुळेच साधा दोरा वापरून पतंगबाजीचा आनंद लुटा, असे आवाहन पोलीस आयुक्तांप्रमाणेच अनेक पक्षीमित्र आणि पर्यावरणप्रेमींकडून केले जात आहे. मांजामध्ये अडकून उपचारासाठी आणल्या जाणाऱ्या जखमी पक्ष्यांमध्ये कावळा, कोकिळा, भारद्वाज, घार, कबुतर या पक्ष्यांचे प्रमाण सर्वाधिक असते. याचे एकमेव कारण म्हणजे मोठ्या आकारामुळे या पक्ष्यांची धडपड कुणाला तरी चटकन दिसते आणि त्यांना उपचारासाठी आणले जाते.

केवळ संक्रांतीच्या काळातच नव्हे, तर वर्षभर मांजामुळे अडकून जायबंदी होणाऱ्या पक्ष्यांचे सत्र सुरू असते. नायलॉन मांजाला काचेची पुड लावण्यात येत असल्याने त्याची धार वर्षानुवर्षे कमी होत नाही. त्यामुळे वर्षभर अशा घटना सुरूच असतात, फक्त संक्रांतीच्या काळात त्याचे प्रमाण वाढलेले असते, असे पक्षीमित्रांनी सांगितले.

पंख छाटले गेल्याने उडणे होते कायमचे बंदमांजामुळे फुलपाखरे, सरडे, खार यांनाही जीव गमवावा लागतो. उपचारासाठी जे पक्षी आणले जातात, त्यांच्यापैकी ६० टक्के पक्षी पुन्हा चांगले होतात; परंतु उर्वरित पक्ष्यांना गंभीर इजा झाल्यामुळे जीव गमवावा लागतो. मांजामुळे ज्या पक्ष्यांचे पंख छाटले जातात, त्यांचे उडणे कायमचे बंद होते आणि ते काही दिवसांतच कुणा अन्य प्राण्यांचे भक्ष्य ठरतात.

अनेक पक्षी गमवतात जीव संक्रांतीच्या आधी आणि नंतरचे ४-५ दिवस मांजामुळे जखमी होणारे पक्षी मोठ्या प्रमाणात सापडतात. उंच झाडावर कुठे तरी मांजा अडकलेला असतो. त्यामुळे त्या मांजात अडकणारा पक्षी जर आकाराने मोठा असेल तर तो इतरांना दिसतो आणि त्याची त्यापासून सुटका केली जाते; पण आकाराने लहान असणारे पक्षी मात्र सहजासहजी कुणाला दिसतही नाहीत आणि त्यांची ताकदही कमी पडते, त्यामुळे त्यांना लगेचच जीव गमवावा लागतो. दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या पक्ष्यांपैकी ८० टक्के पक्षी हे मांजामुळे जखमी झालेले असतात.- डॉ. किशोर पाठक, पक्षीमित्र

टॅग्स :kiteपतंगAurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरण