शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

खंडोबा यात्रेस सुरुवात

By admin | Updated: December 18, 2015 00:19 IST

औरंगाबाद : चंपाषष्ठीनिमित्त सातारा येथील खंडोबा मंदिरात यात्रेला सुरुवात झाली. सकाळी आरती व मूर्तीच्या लघुुरुद्राभिषेकास आबालवृद्धांनी गर्दी केली.

औरंगाबाद : चंपाषष्ठीनिमित्त सातारा येथील खंडोबा मंदिरात यात्रेला सुरुवात झाली. सकाळी आरती व मूर्तीच्या लघुुरुद्राभिषेकास आबालवृद्धांनी गर्दी केली. वांग्याचे भरीत व बाजरीच्या भाकरीचा प्रसाद वाटला जात होता. ‘वाघ्या-मुरळी’चा डफ अन् तुणतुण्याची तार छेडीत खंडेरायाच्या नामाचा गजर सुरू होता. ‘जय मल्हार’ व ‘येळकोट येळकोट’च्या गजराने सातारा परिसर भक्तिमय झाला होता. परिसरात संसारोपयोगी साहित्याची दुकाने, खेळाचे साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. सकाळी आरतीनंतर सवाद्य छबिना मिरवणूक काढून व खंडोबाची पालखी निघाली. ती जहागीरदारांच्या वाड्यात पारंपरिकरीत्या दाखल होऊन तेथे लघुरुद्राभिषेक करण्यात आला. मंदिर व वाड्यात दिवसभर भक्तांची गर्दी होती. मिरवणुकीने रात्री ८.३० वा. मंदिरात मूळस्थानी मूर्ती विराजमान करण्यात आली. सकाळी चंपाषष्ठीच्या आरतीला सकाळी ७ वाजता लोकप्रतिनिधी, अधिकारी आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव पळसकर यांनी केले. बससेवा आणि आरोग्य वाऱ्यावरच सातारा येथील खंडोबाच्या यात्रेत शहरातून बससेवा सोडण्यात आली नसल्याची खंत ट्रस्टी व ग्रामस्थांसह भाविकांनी व्यक्त केली. आरोग्य पथक काही काळ थांबून निघून गेले. यात्रेत पथकाची नियमित ड्यूटी लावावी, असे विश्वस्तांचे म्हणणे आहे. पाणी व सफाईवर लक्ष मंदिरात मनपा तसेच ट्रस्टच्या वतीने पाणी व सफाईवर लक्ष देण्यात आले. कारण भाविकांनी आणलेला प्रसाद तसेच हार, भंडारा, रेवडी इत्यादीसह परिसरात नारळाच्या कवट्या अन् इतर निर्माल्याची सफाई करण्यावर भर दिला होता. सीसीटीव्हीच्या साहाय्याने परिसरावर लक्ष ठेवण्यात येत होते. महिला व पुरुषांच्या दर्शनासाठी स्वतंत्र रांगा करण्यात आल्याने दर्शनातील विलंब आणि गोंधळाला आळा बसला. काळे व रामराव पळसकर यांनी वांग्याचे भरीत, कांद्याच्या पाथीसह बाजरीच्या भाकरीचा प्रसाद वाटला.