शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
3
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
4
Mithilesh Tiwari: बिहारच्या मुख्यमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
5
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
6
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
7
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
8
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
9
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
10
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
11
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
12
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
13
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
14
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
15
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
16
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
17
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
18
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
19
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
Daily Top 2Weekly Top 5

केबीसी आणि दुष्काळ

By admin | Updated: July 24, 2014 00:23 IST

तुकाराम नाईकवाडे, ताडकळस परिसरामध्ये सध्या संकटाचे वातावरण आहे़ पाऊस नसल्याने शेतकरी त्रस्त असतानाच त्यातच केबीसी कंपनीमध्ये झालेल्या फसवणुकीमुळे या परिसरात नागरिक हैराण झाले आहेत़

तुकाराम नाईकवाडे, ताडकळस
परिसरामध्ये सध्या संकटाचे वातावरण आहे़ पाऊस नसल्याने शेतकरी त्रस्त असतानाच त्यातच केबीसी कंपनीमध्ये झालेल्या फसवणुकीमुळे या परिसरात नागरिक हैराण झाले आहेत़ एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे फसवणूक अशा दुहेरी संकटात नागरिक सापडलेले आहेत़
अल्पमुदतीत दुप्पट आणि तीनपट रक्कम देण्याचे आमिष दाखवत केबीसी कंपनीने ताडकळस आणि परिसरातही पाळेमुळे रोवले होते़ अनेक नागरिकांनी मोठा आर्थिक फायदा होईल, या लालसेने या कंपनीत गुंतवणूक केली़ फुलकळस, देऊळगाव, देवठाणा या भागातही गुंतवणूकदारांनी कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे़ ताडकळस व परिसरात साधारणत: दोन ते तीन कोटी रुपये कंपनीमध्ये गुंतले असल्याची चर्चा आहे़ एवढी मोठी रक्कम या भागातून गुंतविण्यात आली आणि आता मात्र कंपनीने गाशा गुंडाळल्याचे स्पष्ट झाले आहे़ त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत़ या भागामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे़ या व्यवसायावरच नागरिकांनी जमा केलेली पुंजी कंपनीच्या हवाली केली होती़ गुंतवलेले पैसे देखील मिळाले नाहीत आणि दुसरीकडे पाऊस नसल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ शेतात पेरण्या झाल्या नाहीत़ बी-बियाणे खरेदीसाठी पैसे गुंतले आहेत़ पेरले नाही तर उत्पन्न मिळणार नाही़ पेरणीचा कालावधी उलटून जात आहे़ जुलै महिना संपत आला तरीही पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल आहे़ एकंदर केबीसी आणि दुष्काळ अशा दुहेरी संकटात येथील नागरिक अकडला आहे़