औरंगाबाद : सामान्य जनतेला दामदुपटीचे आमिष दाखवून केबीसीमध्ये मोठ्या रकमा गुंतविण्यासाठी प्रोत्साहित करणारे एजंट आज गब्बर झालेले आहेत. त्यांच्यामुळेच अनेक जण देशोधडीला लागले असल्याने त्यांच्यावर औरंगाबाद पोलीस गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी आता कागदपत्रे जमा करण्यास सुरुवातही केली आहे.
केबीसीमध्ये पैसे गुंतविल्यास अल्पावधीतच अडीचपट रक्कम देण्याचे आमिष दाखवून कंपनीच्या एजंटांनी सामान्य जनतेकडून मोठ्या रकमा उकळल्या. या रकमा कंपनीत गुंतवून त्यांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. कायद्यातील तरतुदीनुसार जेथे फसवणूक झाली त्या ठिकाणच्या जवळच्या पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा दाखल केला जातो. केबीसीमध्ये पैसे गुंतविण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देणाऱ्या एजंटांनीच त्यांच्याकडून रकमा घेतल्या. नंतर त्यांनी त्या रकमा कंपनीत जमा केल्या आहेत. नाशिक येथे जाऊन गुंतवणूक करणाऱ्यांच्या तक्रारींवर नाशिक आर्थिक गुन्हेशाखा तपास करीत आहेत, तर ज्यांनी औरंगाबादेत गुंतवणूक केली आहेत, त्यांच्या तक्रारीवरून येथे गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले.
गुरुवारी पोलिसांनी येथे आलेल्या तक्रारदारांचे फॉर्म भरून घेतले आहेत. त्यांची किती रकमेची फसवणूक झाली. तसेच त्यांनी कोणामार्फत आणि कोणत्या एजंटच्या सांगण्यावरून पैसे गुंतविले याबाबतची माहिती आज जमा केली आहे. या माहितीच्या आधारे पोलीस आता कंपनीचे संचालक आणि त्यांच्या एजंटांविरोधात गुन्हे दाखल करणार आहे.
तक्रारदारांनी पुढे येणे आवश्यक
आतापर्यंत एकही तक्रारदार पुढे आला नव्हता, त्यामुळे पोलिसांना या प्रकरणी गुन्हे नोंदविता आले नाही. अनेक एजंट सामान्य जनतेला मोठ्या रकमा मिळण्याचे आमिष दाखवून गब्बर झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वी केबीसीमध्ये फसवणूक झालेल्या एका गुंतवणूकदार महिलेने तक्रार देण्यास नकार दिल्याने पोलिसांना गुन्हा दाखल करता आला नाही.
केबीसी एजंटावर होणार औरंगाबादेत गुन्हे दाखल
By admin | Updated: July 25, 2014 00:49 IST
औरंगाबाद : सामान्य जनतेला दामदुपटीचे आमिष दाखवून केबीसीमध्ये मोठ्या रकमा गुंतविण्यासाठी प्रोत्साहित करणारे एजंट आज गब्बर झालेले आहेत.
केबीसी एजंटावर होणार औरंगाबादेत गुन्हे दाखल
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}