शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवासाठी सजतोय कर्णपुरा यात्रा परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 01:06 IST

दि. २१ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असल्यामुळे भाविकांच्या स्वागतासाठी आणि मनोरंजनासाठी कर्णपुरा येथील यात्रेचीही जय्यत तयारी सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कर्णपुरा येथील कर्णी देवी अवघ्या शहराचेच श्रद्धास्थान आहे. नवरात्रोत्सवादरम्यान केवळ शहरातूनच नव्हे तर मराठवाड्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात. कर्णपुरा येथे भरणारी यात्रा दरवर्षी आबालवृद्धांसाठी मोठे आकर्षण ठरते. दि. २१ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असल्यामुळे भाविकांच्या स्वागतासाठी आणि मनोरंजनासाठी कर्णपुरा येथील यात्रेचीही जय्यत तयारी सुरू आहे. घटस्थापनेच्या दिवशी पहाटे तीन वाजता धार्मिक विधीला सुरुवात होणार असून, सहा वाजता आरती होऊन महोत्सवास सुरुवात होईल.यात्रेत विविध खेळ आणि स्टॉल लावण्यासाठी परराज्यातूनही अनेक व्यापारी, कारागीर दरवर्षी येतात. उत्सव जवळ आल्यामुळे आपापले खेळ लावण्यासाठी व्यापाºयांची जणू लगीनघाईच सुरू असल्याचे उत्साहवर्धक दृश्य मंगळवारी दुपारी कर्णपुºयात दिसून आले. आपल्या खेळाची किंवा दुकानाची जुळवाजुळव करताना मागील चार- पाच दिवसांपासून नियमितपणे बरसणाºया वरुणराजाचा सामनाही या व्यापाºयांना करावा लागत आहे.यात्रेसाठी उभारण्यात आलेल्या कमानीतून आत प्रवेश केल्यावर विविध प्रकारचे खेळ यात्रेक रूंचे लक्ष वेधून घेणार आहेत. पाच उंचच उंच आकाशपाळणे यंदाच्या महोत्सवाचे आकर्षण ठरतील. याशिवाय दरवर्षीप्रमाणे या वर्षीही २ प्रकाराचे टोरा- टोरा गेम, बे्रकडान्स, आरसा हाऊस, पन्नालाल गधा, लहानमुलांसाठी कमी उंचीचे रहाटपाळणे, मिनीट्रेन अशा विविध प्रकारच्या खेळांनी कर्णपुरा यात्रा सजणार आहे. यानंतर दुसºया टप्प्यात चपला, ज्वेलरी, क्रॉकरी, शोभेच्या व कलाकु सरीच्या वस्तू, हातमागाच्या वस्तूंचे विविध स्टॉल असतील. तिसरा टप्पा खास खवय्यांसाठी सजणार असून, यामध्ये विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले जाणार आहेत. कर्णपुºयाच्या समोरच्या पंचवटी चौकात उड्डाणपुलाखालील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना गाडी चालविणे मोठे जिकीरीचे ठरते आहे. यात्राकाळात हजारोंच्या संख्येने भाविक या परिसरात येतात, ही गोष्ट लक्षात घेऊन यात्रेपूर्वीच रस्त्याचे काम करायला पाहिजे होते, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.