शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कंधार नगराध्यक्षपदी केंद्रे, उपनगराध्यक्षपदी कांबळे

By admin | Updated: August 17, 2014 00:53 IST

कंधार : कंधार पालिकेच्या नगराध्यक्षपदी अनुसया केंद्रे तर उपनगराध्यक्षपदी सुधाकर कांबळे यांची निवड १६ आॅगस्ट रोजी विशेष सभेत झाली.

कंधार : कंधार पालिकेच्या नगराध्यक्षपदी अनुसया केंद्रे तर उपनगराध्यक्षपदी सुधाकर कांबळे यांची निवड १६ आॅगस्ट रोजी विशेष सभेत झाली. दोन्ही पदाच्या निवडीत माजी आ. प्रताप पाटील चिखलीकर यांची सरशी झाली. नाट्यमयरित्या नळगे-चिखलीकर गटाचे नगरसेवक व भाजपाच्या नगरसेवकाची साथ निवडीत दिसून आली. न.प.निवडणुकीत चिखलीकर-नळगे यांना १७ पैकी १३ जागी विजयी मिळाला. नगराध्यक्ष- उपनगराध्यक्ष निवडी सहज पार पडल्या. परंतु चिखलीकर-नळगे यांच्यात राजकीय विसंवाद आला. त्यामुळे न.प. सभागृहात याची प्रचिती अनेकदा आली. नगराध्यक्षा शोभाताई नळगे व उपनगराध्यक्ष जफरोद्दीन बाहोद्दीन यांचा कार्यकाल संपत आल्याने नवीन कार्यक्रम जाहीर झाला आणि राजकारण पुन्हा तापले. नळगे गटाकडून डॉ. बडवणे, चिखलीकर गटाकडून अनुसया केंद्रे व काँग्रेसकडून मंगनाळे यांचे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अनुसया केंद्रे यांना चिखलीकर- नळगे गटाचे १३ व भाजपाचे १ अशी १४ मते मिळाली. काँग्रेस उमेदवारास २ मते मिळाली. उपनगराध्यक्षपदासाठी चिखलीकर गटाचे सुधाकर कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे बिनविरोध निवड झाली. पिठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, सईदखाँ आदींची यावेळी उपस्थिती होती. (वार्ताहर)