शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

कृषि शिल्पाचा दुर्मिळ वापर असलेले कलिंदेश्वर

By admin | Updated: August 4, 2014 00:48 IST

जगदीश पिंगळे, बीड शिवालयाच्या स्थापत्य कलेत एक वेगळी शैली जपलेले बिंदूसरेच्या तीरावरील शिवालय म्हणजे कलिंदेश्वर होय़ या ठिकाणी कृषि शिल्पांचा दुर्मिळ वापर केल्याचे आढळून येते़

जगदीश पिंगळे, बीडशिवालयाच्या स्थापत्य कलेत एक वेगळी शैली जपलेले बिंदूसरेच्या तीरावरील शिवालय म्हणजे कलिंदेश्वर होय़ या ठिकाणी कृषि शिल्पांचा दुर्मिळ वापर केल्याचे आढळून येते़बिंदूसरा नदीला कलिंद कन्या हे प्राचीन नाव होते़ या नदीच्या तीरावर पालीजवळ नागनाथ, बीड शहरालगत सोमेश्वर, कनकालेश्वर आणि कलिंदेश्वर अशी चार शिवालये आहेत़ बीडचे इतिहास अभ्यास डॉ़ सतीश साळुंके लोकमतशी बोलताना म्हणाले की, बहमनी काळातील हे मंदिर शिल्पकलेचा एक अजोड नमूना आहे़ शिल्पांचा उठावदारपणा पर्यटकांच्या तातडीने नजरेत भरतो़ त्यांच्यावर राजस्थानी शैलीचा प्रभाव येथील शिल्पकलेत आढळून येतो़ हत्तीच्या अंबारीचे शिल्प आकर्षक आहे़ बाह्य स्तंभही इंडो-इस्लामिक स्थापत्य कलेची ओळख करणारी आहेत़ मंदिराच्या गाभाऱ्यात वरच्या बाजूला हिंदू संस्कृतीचे प्रतीक असलेले कमळ उलटे लावलेले आहे़ शिवाय अष्टकोनी नक्षीकाम हे ही एक वैशिष्ट्य आहे़ दोन कमानीच्या मध्ये विविध धान्याच्या कणसांची शिल्पे आहेत़ अत्यंत दुर्मिळ अशी कृषि संस्कृतीची परिचय करुन देणारी ही शिल्पे कदाचित महाराष्ट्रातील शिवालयांमध्ये फक्त बीडच्या कलिंदेश्वरात आढळून येत असावी, असे डॉ़ साळुंके म्हणाले़या मंदिरामध्ये पशुपक्ष्यांचीही शिल्पे आहेत़ या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख आहे़ बीड शहरातील इतर शिवालयांची प्रवेशद्वारे पश्चिममुखी आहेत़ साधारण चौदाव्या ते पंधराव्या शतकातील हे मंदिर बहमनीच्या राजवटीत बांधलेले आहे़ एक शिल्पकलेचा अजोड नमुना बीड शहरात असूनही अनेकदा पर्यटकांचे याकडे दुर्लक्ष होत आहे़ या मंदिराची आणखी देखभाल केल्यास हे मंदिर निश्चितच महाराष्ट्रातील एक आकर्षक शिवालय ठरेल़