शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कड्याचे ३३ के.व्ही. उपकेंद्रच अंधारात !

By admin | Updated: September 23, 2014 23:42 IST

कडा: आष्टी तालुक्यातील बारा गावांना विद्युत पुरवठा करणारे कड्याचे ३३ के.व्ही. विद्युत केंद्रच अंधारात असल्याचे दिसून येत आहे.

कडा: आष्टी तालुक्यातील बारा गावांना विद्युत पुरवठा करणारे कड्याचे ३३ के.व्ही. विद्युत केंद्रच अंधारात असल्याचे दिसून येत आहे. या कार्यालयाची मोठी दुरवस्था झाली असून सुविधांचा अभाव आहे. याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांमधून केला जात आहे.कडा ३३ के.व्ही. उपकेंद्रांतर्गत १२ गावांचा समावेश होतो. यामध्ये टाकळी अमिया, रूई, खराटे वडगाव, आनंदवाडी, केरूळ, कडा, खाकाळवाडी, शेलारवाडी, मोरेवाडी, शेरी खुर्द, शेरी बु. आदी गावांचा समावेश आहे. या गावांना सुरळीत विद्युत पुरवठा व्हावा यासाठी महावितरण कार्यालयाने ३३ के.व्ही. उपकेंद्र उभे केले. या उपकेंद्रात बारा कर्मचारी, चार आॅपरेटर नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र या ठिकाणच्या कार्यालयाची दयनीय अवस्था निर्माण झाल्याने कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कार्यालयात बसताना येथील कर्मचारी जीव मुठीत धरून बसत आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये कार्यालयाला गळती लागते. त्यामुळे बसण्यासाठीची जागा राहत नाही. दरवाजे, खिडक्या कार्यालयाला नसल्याने विविध अडचणींचा सामना या कर्मचाऱ्यांना करावा लागतो.कार्यालयाच्या चोहूबाजूंनी अडचण असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिसरात गवत, बाभळींचा विळखाही पडल्याने येथील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सुविधांचा अभावया ठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोयी- सुविधा पुरविल्या जात नाहीत. येथील कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी पाण्याची सोयही नाही. तसेच शौचालय उपलब्ध नसल्याने उघड्यावर शौचास बसण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. यामध्ये महिलांची कुचंबना होत आहे. या उपकेंद्रांतर्गत बारा गावांना वीजपुरवठा करून गाव उजेडात ठेवण्याचे काम केले जाते. मात्र येथील कर्मचाऱ्यांनाच सोयी सुविधा मिळत नसल्याने व उपकेंद्रातच वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने हे कार्यालयच अंधारात असल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे साफ दुर्लक्ष करीत आहेत. वरिष्ठांच्या या दुर्लक्षामुळे येथील कर्मचाऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यामधून संताप व्यक्त होत आहे. येथील कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा पुरवून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे. याबाबत आष्टी महावितरणचे अधिकारी राहूल जायभाये म्हणाले, या ठिकाणचा प्रश्न सोडविण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. (वार्ताहर)