शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटाच्या महिलांची थट्टा

By admin | Updated: June 25, 2014 01:05 IST

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील शहाजमानी महिला बचत गटाला वीजबिल वितरण आणि रीडिंंग घेण्याचे काम देण्यात आले होते.

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील शहाजमानी महिला बचत गटाला वीजबिल वितरण आणि रीडिंंग घेण्याचे काम देण्यात आले होते. मात्र मागील तीन महिन्यांपासून संबंधित बचत गटाला त्यांच्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. वारंवार मागणी करुनही वीज कंपनीकडून दखल घेतली गेली नसल्याने अखेर २४ जून रोजी संबंधित महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.शिराढोण येथील शहाजमानी महिला बचत गटाला मागील तीन वर्षापूर्वी वीजबिल वितरण आणि रीडिंगचे काम सोपविण्यात आले होते. सध्याही फोटो मीटर रीडिंगचे काम कंपनीच्या वेळापत्रकानुसार सुरु आहे. मात्र जून २०१३ पासून कळंबच्या वीज कार्यालयाकडून महिला बचत गटाला सहकार्य केले जात नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे. केलेल्या कामाच्या आॅर्डरही अधिकाऱ्यांकडून अडवून धरल्या जात आहेत. वर्क आॅर्डर देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी केली जात आहे. त्यामुळे संबंधित महिला बचत गटाची कोंडी झाली आहे. परिणामी सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून महिला बचत गटाला त्यांच्या कामाचा मोबदला मिळवून द्यावा, असेही बचत गटाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु करण्यात आलेल्या उपोषणात बचत गटाच्या अध्यक्षा मलेका फेरोज पठाण, सचिव हलीमा मुन्शी कुरेशी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या आंदोलनाला यशस्विनी अभियानच्या जिल्हा समन्वयक मनीषा राखुंडे, नेहरु युवती व साई सखी महिला मंडळाच्या अध्यक्षा मंजुषा खळदकर, यशस्विनी महिला बचत गटाच्या अंजली पाटील, गरुडझेप महिला बचत गटाच्या सदस्या आशा राखुंडे, साक्षी माने, सुरैय्या शेख, सुशीला साठे, शेषाबाई कोळी, शहनशिल फेरोज पठाण, अजीजाबी शब्बीर शेख, आरेफा आतीक शेख आदींनी पाठिंबा दिला. याउपरही मोबदला न मिळाल्यास आंदोलन आणखी तीव्र करु, असा इशाराही देण्यात आला. (प्रतिनिधी)