परभणीत स्वाभिमानीचे कृषीमंत्र्यां विरोधात जोडेमारो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 20:05 IST2018-06-04T14:53:16+5:302018-06-04T20:05:03+5:30
केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्याचा परभणीत निषेध नोंदविण्यात आला.

परभणीत स्वाभिमानीचे कृषीमंत्र्यां विरोधात जोडेमारो आंदोलन
परभणी : केंद्रीय कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांविषयी काढलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्याचा परभणीत निषेध नोंदविण्यात आला. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहचले. यावेळी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारुन आंदोलन करण्यात आले. देशात शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची होत चालली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. यामुळे शेतकरी संघटीत होऊन आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मागत असताना केंद्रीय कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांविषयी बेताल वक्तव्य करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, असा आरोप संघटनेने केला आहे.
या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामभाऊ आवरगंड, भास्कर खटींग, बालाजी मोहिते, केशव आरमळ, राजू शिंदे, राहुल मस्के, रामकिशन गरुड, गजानन गरुड, बाळू पोते, अजीत पवार, बाळासाहेब ढगे, अमोल जवंजाळ, सुरेश पवार, शाम पोते, माधव खटींग, सुधाकर खटींग आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.