शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सराफा व्यापारी अन् पोलिसांत जुंपली

By admin | Updated: August 12, 2015 00:59 IST

लातूर : कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथून आलेल्या पोलिसांनी लातूरच्या सराफाबाजारातील एका व्यापाऱ्यास मारहाण करून गाडीत बसविल्याचा निषेध करून सराफा व्यापाऱ्यांनी बंद पुकारला़

लातूर : कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथून आलेल्या पोलिसांनी लातूरच्या सराफाबाजारातील एका व्यापाऱ्यास मारहाण करून गाडीत बसविल्याचा निषेध करून सराफा व्यापाऱ्यांनी बंद पुकारला़ अचानक दुकाने बंद करून सराफा व्यापाऱ्यांनी गांधी चौक पोलिस ठाण्यात मोर्चा काढला़ गर्दी जास्त वाढल्याने गांधी चौक पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी किरकोळ लाठीमार केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली़ पोलिसांनी लाठीमाराचा इन्कार करुन फक्त जमाव पांगविल्याचे सांगितले़गुलबर्गा पोलिसांत सोने चोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे़ या चोरीप्रकरणात लातूरचे खंडू कांबळे व सुनिल गडगेवार हे दोन आरोपी आहेत़ पोलिसांनी अधिक चौकशी केल्यावर त्यांनी लातूरच्या दुकानात सोने विकल्याची कबुली दिली़ त्यानंतर गुलबर्गा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीवकुमार आरोपींना घेऊन लातुरात आले होते़ आरोपींनी सोने विक्री केलेली दुकाने दाखविल्यावर पोलिसांनी एका व्यापाऱ्यास मारहाण करून गाडीत बसविल्यानंतर सराफा व्यापारी संतप्त झाले़ त्याचबरोबर अन्य दोन व्यापाऱ्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेऊन कर्नाटक पोलिस गांधी चौकात आले़ सराफा व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून पोलिसांचा निषेध करीत पोलिस ठाणे गाठले़ दरम्यान, आमदार अमित देशमुख यांनी पोलीस ठाण्यात येऊन व्यापारी व पोलिसांशी चर्चा केली़ यावेळी अपर पोलीस अधीक्षक लता फड, पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोळंकी, सराफा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विश्वनाथ किनीकर आदींची उपस्थिती होती़ चर्चेनंतर ताब्यात घेण्यात आलेल्या तिन्ही व्यापाऱ्यांना पोलिसांनी चौकशी करून सोडून दिले, त्यानंतर प्रकरण निवळले़ (प्रतिनिधी)पोलीस आणि सराफा व्यापाऱ्यांचा वाद चिघळला होता़ व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करून पोलिस ठाण्याकडे मोर्चा वळविला़ व्यापाऱ्यांना नाहक त्रास होऊ नये, यासाठी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोळंकी व सराफा असोशिएशनचे अध्यक्ष विश्वनाथ किनीकर यांनी आमदार अमित देशमुख यांना ही माहिती दिली़ त्यांनी थेट गांधी चौक पोलीस ठाणे गाठले़ एखाद्या प्रश्नासाठी आमदार अमित देशमुख पहिल्यांदाच पोलीस ठाण्यात गेल्याचे पहायला मिळाले़ त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करुन वाद मिटविला़ लातूरच्या राजकारणात राजकीय नेते क्वचित वेळाच पोलीस ठाण्यात जातात़ अनेक दिग्गज नेते पोलिस ठाण्यात गेल्याचे ऐकिवातही नाही़ परंतु प्रश्न व्यापाऱ्यांचा असल्याने अमित देशमुख यांनी ठाण्यात धाव घेतल्याने चर्चा रंगली होती़ त्यांच्या येण्याने व्यापारी मात्र खुश होते़