शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

जायकवाडी ५३.५३ टक्क्यांवर; पिण्याच्या, उद्योगांच्या पाण्याचा प्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 14:33 IST

Heavy Rainfall in Marathawada : जायकवाडी धरणातून अंदाजे लहान-मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. शिवाय, दोन लाख शेतकरीदेखील धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत.

ठळक मुद्दे मराठवाड्यातील ८ प्रकल्प तुडुंब

औरंगाबाद: मराठवाड्यासह ( Marathwada ) औरंगाबादची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam ) ५३.५३ टक्के पाणीसाठा सध्या झाला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे साठा ( Heavy Rainfall in Marathawada ) वाढल्याने पिण्याच्या आणि उद्योगांच्या पाण्याचा प्रश्न सध्या मिटला असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ४५ टक्के जलसाठा अद्याप कमी आहे. गेल्या वर्षी १० सप्टेंबर रोजी धरणात ९८ टक्के जलसाठा होता. 

जायकवाडी धरणातून अंदाजे लहान-मोठ्या ४२ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. शिवाय, दोन लाख शेतकरीदेखील धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांतील गावे, औद्योगिक वसाहतींसाठी पाणी आरक्षित आहे. शहराला रोज १५० एमएलडी पाणीपुरवठा होतो. तर उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात उपसा होतो. सध्या धरणात ११६२ दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त जलसाठा आहे. २१७० दशलक्ष घनमीटर उपयुक्त जलसाठ्याची धरणाची एकूण क्षमता आहे. यंदाच्या पावसाळ्यात ६०९ मि.मी. पाऊस धरण क्षेत्रात झाला असून, गेल्या वर्षी ७०१ मि.मी. पाऊस धरण क्षेत्रात झाला होता.

हे प्रकल्प भरले आहेत तुडुंबनिम्न दुधना ९६ टक्के, येलदरी १०० टक्के, सिद्धेश्वर ९७ टक्के, माजलगाव ९४ टक्के, मांजरा ८४ टक्के, पेनगंगा ९६ टक्के, मानार १०० टक्के, निम्न तेरणा ७२ टक्के, विष्णुपुरी ९२ टक्के हे प्रकल्प तुडुंब झाले आहेत. सीना कोळेगाव १५ टक्के तर खडका बंधाऱ्यात १०० टक्के आणि शहागड बंधाऱ्यात ४९ टक्के पाणी आले आहे.

गेला खरीप, यंदाच्या रबीला आठ आवर्तने दिलीजायकवाडी धरणातून रबी आणि खरीप हंगाम मिळून ८ आवर्तने (पाणीपाळी) सोडण्यात आले. रबी हंगामातील शेवटची पाणीपाळी फेब्रुवारीअखेरीस संपली. १ मार्च ते ३१ जुलै २०२१ पर्यंत पाणी वितरण करण्यात आले. १२७९ दलघमी पाणी सिंचनासाठी आहे. रबी हंगामात १ लाख ४६ हजार ९०० हेक्टर तर खरीप हंगामासाठी ५३ हजार हेक्टरसाठी हे पाणी दिले. नांदूर मधमेश्वर कालवा, निम्न दुधना या प्रकल्पातील पाणीवाटपाचा विचार यात केला होता. यंदाच्या पावसाळ्यापर्यंत सिंचनासाठी पूर्ण क्षमतेने पाणी दिले. यंदा धरणात ५३.५३ टक्के जलसाठा असल्यामुळे रबी २०२२ व खरिपाला किती पाणी सोडण्यात येईल, हे आताच सांगता येणे अवघड आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणRainपाऊसMarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादagricultureशेती