सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 14:32 IST2025-10-24T14:22:52+5:302025-10-24T14:32:21+5:30
आरएसएसनं नोंदणी प्रमाणपत्र दाखवावं; सुजात आंबेडकरांचे संघाला थेट आव्हान

सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा
छत्रपती संभाजीनगर: काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधी एका कॉलेजसमोर सदस्य नोंदणी अभियान राबवले. यावरुन राज्यातील वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडीनं (VBA) सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील संघाच्या कार्यालयावर ‘जनआक्रोश मोर्चा’ काढला आहे.
पोलिसांनी परवानगी नाकारली
पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा देत मोर्चाला परवानगी नाकारली होती. तरीदेखील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते क्रांती चौकात मोठ्या संख्येनं जमले. हातात फलक आणि झेंडे घेऊन त्यांनी “एकच साहेब, बाबासाहेब” आणि RSS विरोधातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी क्रांती चौक ते संघाच्या कार्यालयाकडे जाणारे सर्व मार्ग बंद केले असून, मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
RSS नं आपलं नोंदणी प्रमाणपत्र दाखवावं; सुजात आंबेडकर यांचे आव्हान
मोर्चादरम्यान बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, “आमच्याकडे एकही खासदार, आमदार नाही. आम्ही सत्तेतही नाही. पण, संविधान वाचवण्यासाठी, न्याय आणि हक्कासाठी आम्ही सर्वात पुढे आहोत. संघाने भारतीय कायद्यानुसार आपली नोंदणी केली आहे का? असेल तर त्यांनी नोंदणी प्रमाणपत्र दाखवावं. नसेल, तर प्रथम संघानं स्वतःची नोंदणी करावी आणि भारतीय कायद्यांनुसार कामकाज करावं. आरएसएसची नोंदणी आहे का, हे देशाला माहीत असणं गरजेचं आहे.” यावेळी क्रांती चौकात कार्यकर्त्यांकडून भाजप आणि संघविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राहुल मकासरे आणि इतरांवरील गुन्ह्यांविरोधात आंदोलन
हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राहुल मकासरे आणि आंबेडकरवादी तरुणांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांविरोधात आयोजित करण्यात आला आहे. युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड यांनी या वेळी उपस्थितांना शपथ दिली की, आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि संविधानिक चौकटीत राहून लढा द्यावा.
संघाची प्रतिक्रिया