शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जालना पालिकेला मिळणार अटल अमृत योजना

By admin | Updated: August 20, 2015 00:29 IST

जालना : जालना पालिकेला सर्वाधिक लाभदायक ठरलेल्या नगरोत्थान योजना रद्द करून त्या ऐवजी अटल अमृत ही योजना देण्याचा निर्णय अंदाज समितीचे प्रमुख

जालना : जालना पालिकेला सर्वाधिक लाभदायक ठरलेल्या नगरोत्थान योजना रद्द करून त्या ऐवजी अटल अमृत ही योजना देण्याचा निर्णय अंदाज समितीचे प्रमुख आ. अर्जुन खोतकर यांनी घेतला आहे. त्याबाबत तात्काळ प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना पालिकेला दिल्या आहेत.बुधवारी सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह येथून समितीच्या दौऱ्यास सुरूवात झाली. आ. अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखालील या पथकात आ. डॉ. मिलिंद माने, आ. चरण वाघमारे, आ. शशीकांत खेडकर, आ. अमरसिंह पंडित यांचा समावेश होता. जिल्हाधिकारी ए.एस. आर. नायक, पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांनी या पथकाचे स्वागत केले.सर्वप्रथम औद्योगिक वसाहती मधील नागेवाडी जवळील टप्पा तीन मध्ये उभारण्यात आलेल्या एलजीबी या कंपनीत भेट देवून पाहणी केली. तेथील कामगारांचे प्रश्न समजावून घेतले. तसेच या कंपनीत किती कामगार आहे. त्यात जालन्यातील स्थानिक कामगारांची संख्या किती?, जमीनी दिलेल्या किती शेतकऱ्यांच्या पाल्यांना नौकरीस ठेवले. आदी बाबतची माहिती घेण्याचे आदेश संबधीत कामगार अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच सर्व अहवाल गुरूवारी होणाऱ्या बेठकीत सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्यानंतर हे पथक औद्योगीक वसाहत टप्पा २ मधील पोलाद व भाग्यलक्ष्मी स्टील कंपनीस भेट देवून पाहणी केली. तसेच पोलाद कंपनीतील एका कॅबीनमध्ये पथकाने सुमारे अर्धातास उद्योजक व अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर हे पथक पोलिस वससाहतीत गेले. तेथे १५० कॉर्टरमधील रूम न १४४ व १४५ ची पाहणी केली. यावेळी वसाहतीमधील पोलिस कुटुंबियानी आपल्या व्यथा मांडल्या. या ठिकाणी कुठलीही सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. निवास स्थानाची डागडजी होत नाही. ती आम्हालााच स्वखर्चाने करावी लागतात. पावसाळ्यात घरांना गळतीलागते अशा अनेक तक्रारीचा पाढा महिलांनी समितींसमोर मांडल्या. तेव्हा समिती प्रमुख खोतकर यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या संबधी विचारले असता सार्वजनीक बांधकाम विभागाकडून दर तीन वर्षांनी दुरूस्ती केली जाते. मात्र अपुरा निधी मिळतो. ६ कोटीचा निधी गरजेचा असताना दीडच कोटी रूपय मिळाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान कार्टरची दुरूस्तीच केली जात नसल्याचे सांगण्यात आल्याने संबधीत अधिकाऱ्यांना समितीतील सदस्यांनी चांगलेच धारेवर धरले होते. एसआरपीएफ मधील निजाम कालिन घरांच्या पाहणी दरम्यान समितीमधील सदस्य ही आवक झाले. या वेळी महिलांनी आम्हाला पाणीही अशुद्ध मिळत असल्याच्या तक्रारी केल्या. जलवाहिनीला जागो जागी गळती लागल्याने पालिकेकडून अशुद्ध पाणी येते तेव्हा आ. खोतकर यांनी जर जलवाहिनी दुरूस्तीसाठी आमदार फंडातून पाच लाख रूपये देतो. पाण्याचा प्रश्न सोडवा असे सांगितले. तसेच आज पर्यंत आमच्या वसाहतीची कोणत्याही राजकीय नेत्यांनी पाहणी केली नाही. तुम्ही पहिल्यादांज आलात आता आमच्या निवास स्थानाचा प्रश्न सोडवा असे काही महिलांनी यावेळी सांगितले. तसेच पोलिस प्रशिक्षण विद्यालयासही भेट देवून तेथील समस्या जाणुन घेतल्या. या दौऱ्यात जिल्हाधिकारी ए.एस. आर नायक, निवासी जिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपविभागीय अधिकारी श्रीकु मार चिंचकर, तहसीलदार रेवननाथ लबडे, जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग, सहाय्यक पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, आरपीटीएसचे प्राचार्य संभाजी कदम, उपअधीक्षक गौर, गुन्हे शाखेचे अनंत कुलकर्णी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जालना नगर पालिकेच्या आवारात समितीमधील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आ. अर्जुन खोतकर म्हणाले या समितीला विधी मंडळाचे अधिकार दिलेले आहे. सत्कारही आम्ही घेवू शकत नाही. मात्र आग्रहा खातर सत्कार घेतला. जालना पालिकेकडे यापूर्वी असलेली नगरोथ्थान योजना रद्द करण्यात आलेली आहे. त्या एवजी अटल अमृत योजनेत पालिकेचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा. या योजनेतून पाणी, भूमीगत गटार, गार्डन, रस्ते आदीं विकास कामे करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, उपनगराध्यक्ष शाह आलमखान, मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्यासह अधिकारी कर्मचारी व नगरसेवकांची उपस्थिती होती.