शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोतील लीज होल्ड मालमत्ता फ्री होल्ड होणे अशक्य

By admin | Updated: May 8, 2014 23:58 IST

औरंगाबाद : सिडकोतील सुमारे ३४ हजार मालमत्ता लीज होल्ड टू फ्री होल्ड होणे सध्या अशक्य असल्याचा निर्वाळा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी आज दिला.

औरंगाबाद : सिडकोतील सुमारे ३४ हजार मालमत्ता लीज होल्ड टू फ्री होल्ड होणे सध्या अशक्य असल्याचा निर्वाळा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी आज दिला. २००६ पासून सिडकोतील नागरिक मालकी हक्कासाठी सिडकोकडे भांडत आहेत. भाटिया यांनी तो निर्णय धोरणात्मक बाब असल्याचे सांगितले. सुमारे ५० शिष्टमंडळांनी व्यवस्थापनातील अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. पत्रकार परिषदेत भाटियांना या प्रकरणी प्रश्न केला असता त्यांनी धोरणात्मक बाब असल्याचे सांगितले. आॅडशेप, एनओसीचे मुद्दे निकाली काढण्यासाठी लवकरच निर्णय होईल, असे सूतोवाचही भाटिया यांनी केले. १९७२ नंतर सिडकोने शहरात १३ नागरी वसाहती वसविल्या. सिडको क्षेत्रात ३४ हजार मालमत्ता असून २००६ मध्ये सेवा-सुविधांचे हस्तांतरण मनपाकडे झाले. सिडको आणि मनपातील करार होताना मालमत्तांच्या मालकीचा मुद्दा पुढे आला. ९९ वर्षांच्या करारानुसार सिडकोने नागरिकांना घरे दिली. त्या वसाहती मनपाकडे वर्ग झाल्यामुळे नागरिकांना मालकी हक्क देण्यात यावा, अशी मागणी ८ वर्षांपासून सुरू आहे. राष्ट्रवादीसह नागरिकांचे निवेदन याप्रकरणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्व विधानसभा शहराध्यक्ष विश्वनाथ स्वामी, संजय गांधी मार्केट संघटनेचे अध्यक्ष भीमराव सोनवणे यांनी भाटिया यांना निवेदन दिले. स्वामी यांनी निवेदनात म्हटले आहे की, मनपाचे हस्तांतरण करताना तत्कालीन नगरविकासमंत्री राजेश टोपे यांनी लीज होल्डचे फ्री होल्ड करण्याबाबत आश्वासन दिले होते; मात्र सिडको व्यवस्थापनाने ती बाब अशक्य असल्याचे सांगितल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आंदोलन करील. सिडकोत नव्याने कर्मचारी भरती करणे, एनओसी मिळणे सोपे करावे, थकबाकीचा विचार न करता एनओसी देण्यात यावी, आॅडशेप भूखंडावर बांधकामाची परवानगी देण्यात यावी, आॅडशेपसाठी भाडेपट्टा आकारू नये, सोसायटी भूखंड हस्तांतरणासाठी आरक्षित प्रवर्गाची अट रद्द करून तीन वर्षे शिथिल करावी, टपरीधारकांकडून पैसे घेण्यास टाळाटाळ केली जात आहे, त्यांना भोगवटा प्रमाणपत्राची अट घालण्यात आली आहे, ती रद्द करावी. व्यवस्थापकीय संचालक भाटिया यांनी सदरील निवेदनाबाबत अनेक मुद्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. निवेदन देताना राकाँपा उपाध्यक्ष साहेबराव घोडके, काशीनाथ कोकाटे, सुनील लोहवे, गणेशसिंग चव्हाण, मनोहर विखणकर, नारायण सरोदे, रोहिदास पवार आदींची उपस्थिती होती.