शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

४६६ उपायांनंतरही सिंचनाची बोंबच

By admin | Updated: April 16, 2016 01:35 IST

हिंगोली : जिल्ह्यात जि.प.च्या लघुसिंचन विभागामार्फत आतापर्यंत बंधारे, तलावांची ४६६ कामे असताना त्याचा सिंचनासाठी फारसा उपयोग होताना दिसत नाही.

हिंगोली : जिल्ह्यात जि.प.च्या लघुसिंचन विभागामार्फत आतापर्यंत बंधारे, तलावांची ४६६ कामे असताना त्याचा सिंचनासाठी फारसा उपयोग होताना दिसत नाही. चुकीच्या साईट, अपुरे पर्जन्यमान व शेतकऱ्यांची निष्काळजी आदी कारणांमुळे ६३३0 हेक्टरवर सिंचन होत असल्याचा अंदाज असला तरी प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळेच आहे.हिंगोली जिल्ह्यात कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे २0 आहेत. त्यातील अनेकांना गेट नाहीत. त्याची हाताळणी खुद्द लघुसिंचन विभाग करीत नाही. तर शेतकरी त्या कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट टाकण्याची कवायत करायला तयार नाहीत. यामुळे यावरून होणाऱ्या ४५२ हेक्टर सिंचनाची अपेक्षा फोल ठरत आहे. दरवर्षी नेमकी चार ते पाच गावेच या बंधाऱ्यांना गेट टाकतात. सिंचन तलावांची संख्या २३ आहे. सेनगावात सर्वाधिक ११ तलाव आहेत. हिंगोली-७, औंढा-३, कळमनुरी-२ अशी इतर तालुक्यांची स्थिती आहे. यातील बोटावर मोजण्याइतके सोडले तर बहुतांश शेतकऱ्यांनी पुन्हा शेती करण्यास सुरुवात केल्याने फारसे उपयुक्त ठरत नाहीत. यातील जुन्या काही तलावांची तर चांगला पावसाळा झाल्यानंतरही योग्य पाणीसाठा होत नसल्याची बोंब आहे. तरीही त्यावर १९२९ हेक्टर सिंचन होते, असा प्रशासनाचा अंदाज आहे. पाझर तलावांची संख्या ५९ आहे. त्यांचीही गत फार वेगळी नाही. यात हिंगोली-१0, सेनगाव-१७, औंढा-११, कळमनुरी-१८ व वसमत-८ अशी तालुकानिहाय स्थिती आहे. यावरून १९८७ हेक्टरला फायदा होतो, असे म्हणने आहे. त्यालाच अप्रत्यक्ष सिंचन असे म्हणायचे. मात्र या तलावांना पाझरच एवढा आहे की, काही ठिकाणी भर पावसाळ्यातही त्यात पाणी दिसत नाही. गावतलाव ७८ आहेत. यात हिंगोली-८, सेनगाव-२३, औंढा-२१, कळमनुरी-१८, वसमत-८ अशी संख्या असून त्याचा फायदा १२१२ हेक्टरला होतो, असा अंदाज आहे. जुन्या पद्धतीतच असलेले काही तलाव वगळले तर अनेक तलाव अतिक्रमणांच्या व पाण्याची चाल बदलण्याच्या नादात भरतच नाहीत. त्यांचाही फारसा फायदा होत असल्याचे चित्र नाही. (प्रतिनिधी)