शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

ठेकेदारावर एकाचा लोखंडी टॉमीने हल्ला

By admin | Published: July 28, 2014 12:44 AM

वाळूज महानगर : घर खरेदी-विक्रीच्या कारणावरून ठेकेदार लोखंडी टॉमीने झालेल्या हल्ल्यात जखमी झाला. हा प्रकार २६ जुलैच्या सायंकाळी घडला.

वाळूज महानगर : घर खरेदी-विक्रीच्या कारणावरून ठेकेदार लोखंडी टॉमीने झालेल्या हल्ल्यात जखमी झाला. हा प्रकार २६ जुलैच्या सायंकाळी घडला. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साजापूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा ठेकेदार शेख इस्माईल शेख इब्राहीम यांनी काही दिवसांपूर्वी गावातील शेख मुसा शेख रसूल यांच्याकडून घर खरेदी केले होते. नवे घर मिळेपर्यंत या घरात राहण्याची परवानगी शेख मुसा याने शेख इस्माईल यांच्याकडून घेतली होती. शेख मुसा हा घर रिकामे करीत नसल्यामुळे शेख इस्माईल याने गावातील प्रतिष्ठित नागरिक व मध्यस्थांच्या मदतीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही शेख मुसा घराचा ताबा देण्याचे टाळत होता. त्यानंतर शेख इस्माईल याने या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार देऊन न्यायालयातही धाव घेतली होती. या प्रकारामुळे संतापलेल्या शेख मुसा व त्याचे साथीदार शेख मुन्सी मुसा, शेख इसाक मुसा व नबीनशहा शेख रसूल यांनी २६ जुलै रोजी साजापुरात सायंकाळी ६ च्या सुमारास शेख इस्माईल व त्यांच्या नातेवाईकांनी शेख सलीम शेख मुसा यांच्याशी वाद घातला. ‘माझ्याविरुद्ध कोर्टात केस का केली व माझे घर तुम्ही कसे घेता?’ असे म्हणून शेख मुसा याने ठेकेदार शेख इस्माईल यांच्या डोक्यावर लोखंडी टॉमीने वार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. आरोपींनी ठेकेदाराला लोखंडी पाईपने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मारहाण होत असताना शेख सलीम याने मध्यस्थी केली असता त्यालाही या आरोपींनी बेदम मारहाण केली. परस्परविरोधी तक्रारीया हल्लाप्रकरणी आरोपी शेख मुसा, शेख मुन्सी मुसा, शेख इसाक मुसा व नबीनशहा शेख रसूल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी शेख मुसा रसूल यानेही घर रिकामे करण्यावरून शेख इस्माईल, शेख कलीम मुसा, शेख मकसूद, शेख कैसर यांनी मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून दोन्ही गटाच्या नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला असून, तपास फौजदार अजयकुमार पांडे करीत आहेत.