शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: July 6, 2014 00:35 IST

औरंगाबाद : शहरातून दुचाकी चोरी करून त्या स्वस्तात विक्री करणाऱ्या एका अट्टल मोटारसायकल चोराला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली.

औरंगाबाद : शहरातून दुचाकी चोरी करून त्या स्वस्तात विक्री करणाऱ्या एका अट्टल मोटारसायकल चोराला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून चोरीच्या आतापर्यंत तीन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.कैलास पिराजी ढोकळे (२२, रा. चौसरनगर) असे आरोपीचे नाव आहे. या कारवाईबाबत उस्मानपुरा ठाण्याचे निरीक्षक भारत काकडे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या वाहन चोऱ्यांना आळा बसावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खबऱ्यांना कामाला लावण्यात आले आहे. चौसरनगरातील रहिवासी असलेला कैलास ढोकळे हा तरुण सतत नवीन दुचाकीवर फिरतो, अशी माहिती एका खबऱ्याने उस्मानपुरा पोलिसांना कळविली होती. त्या माहितीवरून पोलिसांनी कैलासला ताब्यात घेतले. त्याच्याकडे एमएच-२१ एम-१८७१ या क्रमांकाची एक मोटारसायकलही सापडली. त्याला विचारपूस केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. खाक्या दाखविताच अखेर त्याने तोंड उघडले. आपल्याकडे असलेली ही मोटारसायकल १ जून रोजी श्रेयनगरातून चोरी केल्याचे त्याने कबूल केले. तपासात ही मोटारसायकल श्रेयनगरातील विकास देशमुख यांची असल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत कैलासने शहानूरवाडी आणि काल्डा कॉर्नर या परिसरातून आणखी दोन मोटारसायकली चोरी केल्याचेही सांगितले. त्या दुचाकी त्याने स्वस्तात विकून टाकल्या होत्या. या दोन्ही मोटारसायकलीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. कैलासकडून आणखी काही वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक काकडे यांनी व्यक्त केली.