शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम घालणारा आराखडा तयार करण्याचे निर्देश

By admin | Updated: October 10, 2014 00:42 IST

औरंगाबाद : शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम घालणारा आराखडा संयुक्तपणे तयार करावा, तसेच त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती व्ही.एल. आंचलिया यांनी दिले.

औरंगाबाद : शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम घालणारा आराखडा पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, एस.टी. महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आणि आरटीओ यांनी संयुक्तपणे तयार करावा, तसेच त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती व्ही.एल. आंचलिया यांनी दिले.प्रवासी मिळविण्यासाठी मनमानीपणे धावणाऱ्या अ‍ॅपेरिक्षा, टप्पा वाहतुकीची परवानगी घेऊन खुलेआम प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बसेस, काळीपिवळी जीपचालकांची बेबंदशाही आणि सिग्नल तोडून पळणारे दुचाकीचालक यामुळे शहरातील वाहतूकव्यवस्था कोलमडून गेली आहे. बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्याबाबत खंडपीठाने शहर पोलीस आणि आरटीओ यांना वेळोवेळी निर्देश दिले. त्यानुसार वाहतूक शाखेच्या वतीने अ‍ॅपे, रिक्षा आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम उघडली. त्यानंतरही शहरातील बेशिस्त वाहतूक जशी होती तशीच आहे. तीन महिन्यांपासून औरंगाबाद खंडपीठ शहरातील बेशिस्त वाहतुकीसंदर्भात पाठपुरावा करीत आहे. मात्र, बेशिस्त वाहतुकीची समस्या ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे न्यायालयाने यासंदर्भात सुमोटो अवमान याचिका दाखल करून घेतली आहे. याचिकेत न्यायालयाने पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त, एस.टी.चे विभागीय व्यवस्थापक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता आणि आरटीओ यांंची संयुक्त समिती नेमून बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावणारा आराखडा तयार करावा, या आराखड्याची अंमलबजावणी करावी, असे आदेश दिले. सर्वसमावेशक तोडगा काढून पथदर्शक मोहीम राबवावी, असे निर्देश दिले. या याचिकेत न्यायालयाचे मित्र म्हणून अ‍ॅड. आनंद भंडारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यावेळी सरकार पक्षाकडून सहायक सरकारी लोकअभियोक्ता गिरीश नाईक-थिगळे यांनी बाजू मांडली.