शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
6
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
7
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
8
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
9
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
10
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
11
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
12
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
13
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
14
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
15
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
16
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
17
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
18
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
19
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
20
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:ऐवजी ‘डमी’ कर्मचारी ठेवून काम!

By admin | Updated: February 3, 2015 01:00 IST

औरंगाबाद : महावितरणच्या शहर आणि ग्रामीण भागात कर्मचारी स्वत: काम न करता परस्पर अप्रशिक्षित ‘तोतये’ कर्मचारी ठेवून काम करून घेत आहेत.

औरंगाबाद : महावितरणच्या शहर आणि ग्रामीण भागात कर्मचारी स्वत: काम न करता परस्पर अप्रशिक्षित ‘तोतये’ कर्मचारी ठेवून काम करून घेत आहेत. त्यामुळे दुर्घटना होत असून, अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असे आ. प्रशांत बंब आणि नागरिकांनी जिल्हा विद्युतीकरण समितीच्या बैठकीत निदर्शनास आणून दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे कारवाई करू असे सांगितले.यावेळी समिती अध्यक्ष खा. चंद्रकांत खैरे, आ. संदीपान भुमरे, महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे आदींची उपस्थिती होती. ग्रामीण भागात अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतले जात आहे. वाळूजमध्ये एका ‘सब’ कर्मचाऱ्याचा अपघात होऊन मृत्यू झाला; पण त्याचे गांभीर्य अधिकाऱ्यांना नाही, असा आरोप नागरिकांनी केला. नेहमीप्रमाणे अध्यक्षांनी पुन्हा रस्त्यावरील विद्युत खांब काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. शहरातील वीज ग्राहकांना बिले वाढवून आली आहेत, तक्रार सोडविण्यात येत नाही. सेवा मिळत नाही इ. तक्रारी केल्या. ग्रामीण भागात पाच तासांपेक्षा अधिक भारनियमन करण्यात येत आहे. ग्रामीण भागात रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांना एक-दोन महिन्यांनंतर रोहित्र दिले जात नाही. रोहित्र देताना ग्राहकांकडून कर्मचारी पैसे घेत आहेत, अशा तक्रारी मांडल्या.