शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा भाऊंच्या लेखनातून दलित लेखकांना विद्रोहाची प्रेरणा-फ़ मुं़

By admin | Updated: September 6, 2014 00:28 IST

अण्णा भाऊंच्या लेखनातून दलित लेखकांना विद्रोहाची प्रेरणा-फ़ मुं़

नांदेड : दलित साहित्याची प्रेरणा डॉ़ बाबासाहेब आंबेडकर असले तरी अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनातून दलित लेखकांना विद्रोहाची प्रेरणा मिळाली़ अंकुश सिंदगीकर यांनी ‘गंधरव’ या कथासंग्रहातून अण्णा भाऊंची ही पंरपरा कायम ठेवली आहे, असे प्रतिपादन प्रा़ फ़ मुं़ शिंदे यांनी केले़ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने यंदाचा बाबूराव बागुल कथालेखन पुरस्कार अंकुश सिंदगीकर यांच्या ‘गंधरव’ या कथासंग्रहाला देण्यात आला़ या पुरस्काराचे वितरण शुक्रवारी कुसुम सभागृहात फ़ मुं़ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ माणिकराव साळुंखे होते़ प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री डी़ पी़ सावंत, स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ पंडित विद्यासागर यांची उपस्थिती होती़ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या या उपक्रमाविषयी फ़ मुं़ म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळेच नवी पिढी घडली़ या विद्यापीठाने सामाजिक जाणिवा ठेवून हा प्रवास सुरू केला आहे़ नवलेखकांचा गौरव करून त्यांना लेखनासाठी बळ देणारे हे विद्यापीठ सामाजिक बांधिलकी जोपासत आहे़ अण्णा भाऊ साठे, बाबूराव बागुल, नारायण सुर्वे यांच्या साहित्याची परंपरा अंकुश सिंंदगीकर यांच्या मागे उभी आहे़ त्यामुळेच त्यांची कथा सशक्त आहे़पालकमंत्री सावंत म्हणाले, कथाकारांचा गौरव करणे ही काळाची गरज आहे़ जास्तीत जास्त लेखकांना प्रोत्साहित करावे़ यासाठी स्वारातीम विद्यापीठात अण्णा भाऊ साठे, डॉ़ शंकरराव चव्हाण व श्री गुरूगोविंंदसिंघजी अध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ कुलगुरू डॉ़ विद्यासागर, कुलगुरू डॉ़ साळुंखे, लेखक सिंदगीकर, नांदेड विभागीय केंद्राचे संचालक पी़ एम़ शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले़ प्रास्ताविक कुलसचिव प्रकाश आतकरे यांनी केले़ सूत्रसंचालन श्याम पाडेकर यांनी केले़ (प्रतिनिधी)