शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

गुरुंमुळेच प्रेरणा

By admin | Updated: July 12, 2014 00:54 IST

मला या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिकायला मिळाले हेच माझे भाग्य आहे.

मला या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिकायला मिळाले हेच माझे भाग्य आहे. त्यामुळेच आज मी माझे अल्बमस् काढू शकले. माझे गुरू नेहमी म्हणायचे की, तू नक्कीच नाव मोठे करशील. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या गुरूंच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम.आरती पाटणकर ल्ल क्षेत्र कोणतेही असो, त्यात टिकण्यासाठी प्रयत्न तर करीतच असतात. गरज असते ती फक्त दिशा देण्याची. हे दिशा देण्याचे काम फक्त गुरूच करू शकतात. त्यामुळे गुरूला फार मोठे स्थान आहे. माझ्या जीवनात गुरुपौर्णिमा हा एक मोठा सण आहे. क लेच्या क्षेत्रात निपुण होण्यासाठी गुरूशिवाय दुसरा पर्याय नाही. गुरुपौर्णिमा ही आम्हा कलाकारांसाठीफार मोठी गोष्ट आहे. गुरूंच्या मार्गदर्शनाने कला कोणतीही असो ती अवगत करण्यास सोपी जाते. मी पंधरा वर्षांची असताना गायनाला सुरुवात केली. गेल्या पंधरा वर्षांपासून माझी ओळख शास्त्रीय संगीत गायिका म्हणून आहे. तसेच सुरुवातीला मी स्व. पंडित बाळासाहेब बहिरगावकर यांच्याकडे जयपूर घराण्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर स्व. मधुसूदन भावे यांच्याकडे ग्वालियर या संगीत प्रकाराचे शिक्षण मी घेतले. वेगवेगळ्या प्रकारचे गायन करण्याची मला आवड आहे. तसेच माणूस हा मरेपर्यंत शिकत असतो. काही ना काही नवीन शिकायला तो झटतच असतो. त्याप्रमाणे मी माझे गायनाच्या क्षेत्रातील शिक्षण हे पुढे चालूच ठेवले. हे शिक्षण घेत असताना मला अनेक अडचणी आल्या. त्या अडचणी सोडवण्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनामुळे मी सोडवणूक करू शकले.कितीही मोठे कलाकार झालो तरी गुरूंच्या मार्गदर्शनाची गरज ही त्याला भासतच असते. पुढे चालून उस्ताद अफजल हुसेन यांच्याकडे द्रुपद गायकीचे शिक्षण मी घेतले आणि सध्या बनारस घराण्याचे ठुमरी तालीम या गायनाचे शिक्षण मी बद्रीप्रसाद मिश्रा यांच्याकडे घेत आहे. गुरूंच्या मार्गदर्शनाचा शिष्यांना फार मोठा आधार मिळतो. त्यांच्या मार्गदर्शनाने कलेला जिवंतपणा येतो असे मला वाटते.