शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान वाटपाची होणार चौकशी

By admin | Updated: November 21, 2014 00:47 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील दोन ते तीन वर्षात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या व्यक्तींना शासनाने लाखो रुपयांचे अनुदान वाटप केले

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील दोन ते तीन वर्षात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या व्यक्तींना शासनाने लाखो रुपयांचे अनुदान वाटप केले. परंतु, प्रशासनाकडून या निधी वाटपाचे प्रयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करण्यात आले नाही. त्यामुळे लवकरच पथकामार्फत नैसर्गिक आपत्ती अंतर्गत वाटप केलेल्या अनुदानाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुत्रांनी दिली.जिल्ह्यात मागील दोन ते तीन वर्षात विविध नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करण्यात आले. विशेष म्हणजे जिल्ह्यात सहा महिन्याखाली झालेल्या गारपीटीनंतर नुकसानग्रस्तांना कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. परंतु, यातीलही काही शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. तसेच तुळजापूर तालुक्यात गारपीटीचे अनुदान वितरित करताना जास्तीचे क्षेत्र लावून संबधितांना लाभ मिळवून दिल्याचे उघड झाले होते. यामुळे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाहीही करण्यात आली. याच अनुषंगाने जिल्ह्यात मागील दोन ते तीन वर्षात वाटप झालेल्या निधीची पडताळणी करण्यासाठी शासनाचे पथक येणार आहे. या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना निधी वाटपाबाबतचे सर्व लेखे अद्यावत करण्याचे निर्देशही एका पत्रान्वये दिले आहेत. (प्रतिनिधी)