शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

Maharashtra Bandh : वाळूज एमआयडीसीमधील कंपन्यांच्या तोडफोडीवर उद्योजकांमध्ये संताप; हल्लेखोरांना करणार नोकरी बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 3:59 PM

या प्रकरणी उद्योजकांनी संताप व्यक्त केला असून आज येथील बहुतांश उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

औरंगाबाद : महाराष्ट्र बंदमध्येवाळूज एमआयडीसीमध्ये आंदोलकांनी येथे ६० मोठ्या कंपन्या आणि १५ हून अधिक लहान कंपन्यांमध्ये घुसून तोडफोड केली. या प्रकरणी उद्योजकांनी संताप व्यक्त केला असून आज येथील बहुतांश उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांनी एक बैठक घेऊन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

या अकल्पनीय हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी उद्योजक संघटनांनी गुरुवारी रात्री उशिरा एक पत्रकार परिषद घेतली होती. याबाबत पुढील भूमिका घेण्यासाठी सर्व उद्योजकांची एक बैठक मराठवाडा ऑटो क्लस्टर येथे आज सकाळी ११ वाजता झाली. यात सर्व उद्योजकांनी आपले म्हणणे मांडून याप्रकरणी काही सूचना व मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यानंतर शहरातील सर्व उद्योजक संघटनांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्याचे बैठकीत ठरले आहे. कंपन्यांवरील हा हल्ला अतिरेकी स्वरूपाचे असून हल्ल्खोरांची ओळख पटवून त्यांना उद्योगात नोकरी बंदी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. 

पोलिसांना देणार सीसीटीव्ही फुटेज गुरुवारी झालेल्या तोडफोड प्रकरणी उद्योजकांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र नाराजगी व्यक्त केली. हा हल्ला थांबविण्यास पोलीस असमर्थ ठरल्याचे मत उद्योजकांनी बैठकीत व्यक्त केले. तसेच कालच्या घटनेतील उद्योगातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात येणार आहेत. तसेच पोलिसांत तक्रारदेखील करण्यात येणार आहे अशी माहिती सीएमआयचे माजी अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी दिली. 

हल्लेखोरांना नोकरी बंदी हल्लेखोरांचे सीसीटीव्हीतील फुटेज सर्व उद्योजकांना देण्यात येणार आहे. यात आढळून येणाऱ्या हल्लेखोरांना ओळखून ते कामावर असतील तर त्यांना कामावरून कमी करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच हल्लेखोरांना यापुढे येथील उद्योगांमध्ये नोकरीसाठी बंदी घालण्यात आल्याचे या बैठकीत ठरले आहे.  

आज उद्योग बंद ठेवण्याचा निर्णय एण्ड्युरन्सचे सर्व प्लांट शुक्रवारी बंद राहणार आहेत. मायलॉन, कॅनपॅक, सिमेन्स, नहार इंजि. यासह अनेक उद्योग बंद राहतील. 

या कंपन्यांना बसला फटका  आंदोलकांच्या हल्ल्यात बजाज, व्हेरॉक, इण्डुरन्स, स्टरलाईट, कॅनपॅक, गुडईअर, मायलान, स्टरलाईट, आकार टुल्स, मेटलमॅन, व्हेरॉक, एण्डुरन्स, सीमेन्स, गणेश प्रेसिंग, आकांक्षा पॅकेजिंग, नहार इंजिनिअरिंग आदी बड्या कंपन्यांसह इतर छोट्या ६० हून अधिक कंपन्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. आकार टुल्स कंपनीत उत्पादित विविध प्रकारचे पान्हे व साहित्य जमावाने रस्त्यावर फेकले होते. तर बजाज ऑटो कंपनीत जनरल शिफ्टमध्ये येणाऱ्या कामगारांना बंदमुळे कंपनीने फर्स्टशिपमध्ये कामासाठी बोलावले होते. याची माहिती मिळताच आंदोलकांनी कामगारांच्या बस अडवून कामगारांना त्यांनी खाली उतरू दिले नाही. या घटनेमुळे कंपनी व्यवस्थापनाने सेकंड व थर्ड शिफ्ट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

भाजप उद्योग आघाडीकडून कारवाईची मागणी  वाळूज औद्योगिक क्षेत्रात तोडफोड करणाऱ्या हल्लेखोरांची  सीसीटीव्ही फूटेजव्दारे ओळख पटवून कठोरात कठोर शासन करण्याची मागणी भाजपा उद्योग आघाडीने  मुख्यमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे केली आहे. अशी माहिती भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी दिली आहे.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMaratha Reservationमराठा आरक्षणWaluj MIDCवाळूज एमआयडीसी