शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

‘तावरजा’ परिसरात वाढली वृक्षतोड

By admin | Updated: June 1, 2014 00:25 IST

रमेश शिंदे , औसा औसा व लातूर या दोन तालुक्यांच्या सीमेवर ३० वर्षांपूर्वी उटी येथे तावरजा धरण बांधण्यात आले.

 रमेश शिंदे , औसा औसा व लातूर या दोन तालुक्यांच्या सीमेवर ३० वर्षांपूर्वी उटी येथे तावरजा धरण बांधण्यात आले. सध्या या धरणाच्या खालच्या बाजूस मोठ्या प्रमाणात वनराईचे क्षेत्र आहे. धरण परिसरात मोठमोठी वृक्षे वाढली आहेत. मागील एक वर्षापासून लातूर जिल्ह्यात कुºहाडबंदी जाहीर करण्यात आली. तरीही तावरजा प्रकल्प परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून, वनविभागाच्या अधिकार्‍यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. औसा व लातूर तालुक्याच्या सीमेवर तावरजा नदी वाहते. या नदीच्या दक्षिणेकडे औसा तालुका तर उत्तरेकडे लातूर तालुका आहे. या नदीवर उटी येथे तावरजा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. ३० वर्षांपूर्वी हा प्रकल्प अस्तित्वात आला. त्यामुळे या प्रकल्पाच्या वाळूखाली आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वनराई बहरली आहे. जागोजागी मोठ-मोठे वृक्ष या वनराईची साक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. पण; या वनराईवर अवैध वृक्षतोड करणार्‍यांची वक्रदृष्टी पडली आणि आज हे वृक्ष भुईसपाट होत असल्याचे दिसून येत आहे. कधी रात्रीच्या वेळी तर कधी दिवसाढवळ्या राजरोसपणे ही वृक्षतोड केली जात आहे. वनविभागाच्या अधिकार्‍यांनाही वृक्षतोडीची माहिती आहे. पण या अवैध वृक्षतोडीकडे सोईस्कर की अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जाते, हा मात्र संशोधनाचा विषय होत आहे. शासन एकिकडे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा नारा देत आहे. वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च शासन करीत आहे. रोपवाटिकांना अनुदान देऊन रोपे तयार केली जात आहेत. वृक्षलागवड करण्यासाठी ही रोपे मोफत दिली जात आहेत. वृक्षलागवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीही केली जात आहे. वृक्षांची संख्या कमी झाल्यामुळे जिल्ह्यात कुºहाडबंदी जाहीर करण्यात आली. एकीकडे कुºहाडबंदी करून वृक्षलागवडीवर जोर दिला जात आहे. तर दुसरीकडे मात्र मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शेतकरी आपल्या शेतीमधील औजारांसाठी एखाद दुसरे झाड तोडतो. पण; शेतकर्‍यांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. याकडे वनविभागाच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. त्यामुळे ही अवैध होणारी वृक्षतोड थांबवावी व अवैध झाडे तोडणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी वनप्रेमींकडून केली जात आहे. याबाबत औसा वनपरिक्षेत्राचे अधिकारी शाहुराज गुरव यांच्याशी संपर्क साधला असता आमच्याकडून झाडे तोडण्यास परवानगी नाही. पण पाटबंधारे विभागाने जर झाडे तोडण्यासाठी परवानगी दिली असेल, तर ते झाडे तोडू शकतात. पाटबंधारे विभागाची परवानगी नसेल आणि अवैधरीत्या वृक्षतोड होत असेल तर अवैध वृक्षतोड करणार्‍यांवर निश्चित कारवाई करू, असे ते म्हणाले. याबाबत तावरजा प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता डी.आर. घोडके यांच्याशी संपर्क साधला असता मागील वादळामुळे उखडून पडलेली झाडे शासनाची परवानगी घेऊन हरास केली आहेत.