शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

मजूर संख्या वाढवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा

By admin | Updated: November 4, 2014 01:37 IST

उस्मानाबाद : ‘जिल्ह्यात राष्ट्रीय रोज् ागार हमी योजनेला मरगळ’ या मथळ्याखाली २८ आॅक्टोबर रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रोहयोंतर्गत सुरु असलेल्या कामांचा

उस्मानाबाद : ‘जिल्ह्यात राष्ट्रीय रोज्ागार हमी योजनेला मरगळ’ या मथळ्याखाली २८ आॅक्टोबर रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रोहयोंतर्गत सुरु असलेल्या कामांचा ३ नोव्हेंबर रोजी आढावा घेतला. योजनेला गती देण्याच्या स्पष्ट सूचना देतानाच १५ दिवसांमध्ये मजुरांची संख्या किमान १० हजारावर गेली पाहिजे, असे आदेशित केले. त्यामुळे आता तालुकास्तरावरील यंत्रणा किती प्रमाणात अंग झटकून कामाला लागल्या हे १५ दिवसानंतरच समोर येणार आहे.मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरु करण्यात आली. मात्र या योजनेलाच जिल्ह्यात घरघर लागली. मागील आठवडाभरात अवघी ७७ कामे सुरु होती. मजुरांची संख्याही १ हजाराच्या घरातच होती. या अनुषंगानेच ‘लोकमत’ने ‘राष्ट्रीय रोजगार हमी योजनेला मरगळ’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने रोहयोसंदर्भात सोमवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मजूर आणि शेतमजुरांनाही रोहयोच्या माध्यमातून नवीन कामे सुरु करुन रोजगार उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यामुळे ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी रोजगार सेवकांच्या कामाचा आढावा घ्यावा, असे निर्देश दिले. जे अधिकारी या कामामध्ये कुचराई करतील त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्ह्यात अत्यंत कमी प्रमाणात कामे सुरु आहेत. मजुरांचीही संख्या कमी आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसांमध्ये किमान १० हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यामुळे आता प्रत्येक तालुक्याला किमान एक ते दीड हजार मजुरांच्या हाताला काम द्यावे लागणार आहे. रोजगाराअभावी एकही मजूर वंचित राहता कामा नये. नरेगाच्या हेल्पलाईनवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी स्थानिक पातळीवर तातडीने निवारण करावे. रोहयोची कामे वेळेत होत नसतील तर तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करावा, असे निर्देशही डॉ. नारनवरे यांनी दिले.शौचालयाची अवघी९३९ कामे सुरु४रोहयो अंतर्गत विविध प्रकारची ३ हजार ७३० कामे मंजूर आहेत. त्यापैकी १ हजार ४५ कामे पूर्ण झाली आहेत. वैयक्तिक शौचालयाच्या ६ हजार ३८६ कामांना मान्यता मिळाली आहे. त्यापैकी अवघी ९३९ कामे सुरु असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांनी दिली.