शहरात ९, ‘ग्रामीण’मध्ये २४ कोरोना रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:05 IST2021-07-03T04:05:31+5:302021-07-03T04:05:31+5:30
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या ३३ नव्या रुग्णांची भर पडली. यामध्ये शहरातील ९ तर ग्रामीण भागातील २४ ...

शहरात ९, ‘ग्रामीण’मध्ये २४ कोरोना रुग्णांची वाढ
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या ३३ नव्या रुग्णांची भर पडली. यामध्ये शहरातील ९ तर ग्रामीण भागातील २४ रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असताना पाच रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ६३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील रुग्णसंख्या पुन्हा एकदा एकेरी संख्येत आल्याने दिलासा व्यक्त होत आहे. गेली काही दिवस ग्रामीण भागांत दररोज ५० पेक्षा अधिक रुग्णांचे निदान होत होते. परंतु ग्रामीण भागात आढळणाऱ्या नव्या रुग्णांत शुक्रवारी घट झाली आणि रुग्णसंख्या ५० खाली आली. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४६ हजार ३३४ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४२ हजार २७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १४ आणि ग्रामीण भागातील ५५ अशा ६९ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना हर्सूल येथील ६० वर्षीय पुरुष, तलवाडा, वैजापूर येथील ८५ वर्षीय महिला, वाकळा, वैजापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, शिरसमाळ येथील २८ पुरुष, इमामपूरवाडी, पैठण येथील ३६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
मोतीलालनगर १, इंदिरानगर १ यासह शहरातील विविध भागांत ७ रुग्ण आढळले.
ग्रामीण भागातील रुग्ण
बजाजनगर १, एमआयडीसी वाळूज १, दरकवाडी १, फुलंब्री १, पैठण १, केऱ्हाळा, केळगाव, सिल्लोड १ यासह विविध गावांमध्ये १८ रुग्ण आढळले.