मराठवाड्यात जलजीवन मिशनच्या कामांना निधीअभावी घरघर, २४८७ कोटींची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 19:21 IST2025-02-27T19:20:46+5:302025-02-27T19:21:20+5:30

२४८७ कोटी दिले, तर गावांना पाणी; ७३७१ पैकी ५६३४ गावांत काम मंदावले

In Marathwada, Jaljeevan Mission's works are suffering from lack of funds, needing 2487 crores | मराठवाड्यात जलजीवन मिशनच्या कामांना निधीअभावी घरघर, २४८७ कोटींची गरज

मराठवाड्यात जलजीवन मिशनच्या कामांना निधीअभावी घरघर, २४८७ कोटींची गरज

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात जलजीवन मिशनच्या कामांना निधीअभावी घरघर लागली आहे. परिणामी जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत (एमजीपी) राबविण्यात येणाऱ्या ७३७१ पैकी फक्त १७३७ गावांतील योजना पूर्णत्वाकडे गेल्या आहेत. बाकीच्या गावांतील कामे २५ ते ७५ टक्क्यांदरम्यान अडकली आहेत. ‘हर घर में नल’ हे ब्रीद असलेल्या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला २४८७ कोटींचा निधी मिळाला, तर ५६३४ गावांना योजनेतून पाणी मिळेल.

आठ जिल्हा परिषदेत ७ हजार २०५ गावांतील कामे मंजूर झाली. त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १ हजार १६४ पैकी ६६० कामे पूर्ण झाली. जालन्यात ७३३ पैकी ३२७, परभणी ६६६ पैकी ४७१, हिंगोली ६१६ पैकी ३१५, नांदेड १ हजार २३९ पैकी ६४०, धाराशिव ५९३ पैकी २४६, बीड १ हजार २६५ पैकी ४२१, लातूर जिल्ह्यातील ९२८ पैकी ३४३ योजनांची कामे पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. २७६ गावांत २५ टक्केही पूर्ण झाले नाही. तर, ८८४ कामे ५० टक्क्यांवर आहेत. १ हजार ७७० काम ५० टक्क्यांच्या पुढे सरकली आहेत. एमजीपीअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४, जालना १७, परभणी २४, हिंगोलीत १२, नांदेडमध्ये ३०, धाराशिव २७, बीड २५, तर लातूर जिल्ह्यातील २८ गावांसाठी कामे घेतली. बीड, हिंगोली व परभणी जिल्ह्यात एकाही गावांत योजनेचे काम सुरू झालेले नाही, तर लातूरमध्ये २८ पैकी १४ कामे पूर्ण झाली. ४० गावांत ७५ टक्क्यांपर्यत कामे झाली आहेत. तर, २ गावांत २५ टक्क्यांच्या आत, तर १६ गावांत ५० टक्के काम पूर्ण झाले आहे.

एमजीपीला १ हजार ८९ कोटींची गरज
विभागात एमजीपीद्वारे १६७ कामांसाठी आजवर ३ हजार १३६ कोटींचा खर्च झाला. त्यातील फक्त २७ कामे पूर्ण झाली आहेत, तर उर्वरित कामे अर्धवट आहेत. मार्च अखेरपर्यंत १ हजार ८९ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे.

जि.प.अंतर्गत कामांना १३९८ कोटींची गरज
जिल्हा परिषद यंत्रणेमार्फत ७ हजार २०५ पैकी १७०३ कामे पूर्ण झाली आहेत. ५ हजार १९६ पैकी २१५१ कोटी आजवर दिले आहेत. सुमारे १३९८ कोटींचा निधी मार्चअखेरपर्यंत आल्यास पुढील कामांची वाट मोकळी होईल.

जिल्हानिहाय कामांना निधीची गरज
जिल्हा....... एमजीपीसाठी आवश्यक निधी..................जि.प.साठी आवश्यक निधी

छत्रपती संभाजीनगर ............... २५१ कोटी .........................२६१ कोटी
जालना             ............... ६२ कोटी ..............................१५१ कोटी

परभणी .................५२ कोटी ..............................१०६ कोटी
हिंगोली ............... ५० कोटी .......................८० कोटी

नांदेड             ...............३५२ कोटी ..............................३१२ कोटी
धाराशिव             ............... १२५ कोटी ..............................९३ कोटी

बीड                         ............... ८३ कोटी ..............................३०० कोटी
लातूर             ............... ११२ कोटी ..............................९३ कोटी

एकूण             - १०८९ कोटी ..............................१३९८ कोटी

Web Title: In Marathwada, Jaljeevan Mission's works are suffering from lack of funds, needing 2487 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.