सव्वाअकरा वाजता स्टेट्स अपडेट केले अन तासाभरात तरुणाने स्वतःला संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 16:54 IST2023-01-03T16:54:01+5:302023-01-03T16:54:41+5:30
औरंगाबादमध्ये 28 वर्षीय तरुणाची आत्महत्या, कारण अस्पष्ट...

सव्वाअकरा वाजता स्टेट्स अपडेट केले अन तासाभरात तरुणाने स्वतःला संपवले
औरंगाबाद: गाडी चालवताना स्वतःचा व्हिडीओ स्टेट्सला ठेवल्याच्या अवघ्या तासाभरानंतर एका तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विष्णू मारुती बामणे (28, कांचनवाडी) असे मृताचे नाव असून सोमवारी दुपारी वाल्मी परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला.
कांचनवाडी परिसरातील विष्णू दुधाचा व्यवसाय करत असे. गेल्या वर्षीच त्याचा विवाह पार पडला होता. काल सकाळी रोजच्याप्रमाणे जेवण करून घरातून निघाला. विष्णूने मोठ्या आवाजात गाडीत गाणे लावत स्वतःचा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडीओ त्याने सोशल मिडीयावर स्टेटसवर शेअर केला. मात्र, सकाळी सव्वाअकरा वाजता स्टेटस ठेवलं आणि एक वाजेदरम्यान वाल्मी परीसरात एका झाडाला लटकलेला मृतदेह आढळून आला. झाडाझुडपांमध्ये एका झाडाला लटकलेला आढळल्याने खळबळ उडाली. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचं निदर्शनास आलं असून याबाबतचा पुढील तपास सातारा पोलिसांकडून केल्या जात आहे. त्या पश्चात पत्नीम आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे .