केवळ ७०० रुपयांसाठी मुलाने केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; आरोपीस शिर्डीत पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 16:12 IST2022-05-23T16:12:22+5:302022-05-23T16:12:38+5:30

दुकानातील गल्ल्यात ७०० रुपयांचा हिशोब लागत नव्हता, यावरून बापलेकात झाला वाद

In Aurangabad Boy brutally kills parents for only Rs 700; The accused was arrested in Shirdi | केवळ ७०० रुपयांसाठी मुलाने केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; आरोपीस शिर्डीत पकडले

केवळ ७०० रुपयांसाठी मुलाने केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; आरोपीस शिर्डीत पकडले

औरंगाबाद: पुंडलिक नगर येथे आज सकाळी राहत्या घरात कलंत्री दाम्पत्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. धारदार शस्त्राने निर्घृण खून करून मृतदेह पलंगाच्या खाली लपवून आरोपी घराला बाहेरून कुलूप लावून फरार  झाला होता. या खुनाचा उलगडा झाला असून मुलानेच केवळ ७०० रुपयांसाठी आई-वडिलांचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी मुलगा आकाश हिरालाल कलंत्री यास शिर्डी येथे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, पुंडलिक नगर येथे शामसुंदर  हिरालाल कलंत्री ( ५५) यांचे भांडे विक्रीचे दुकान आहे. शनिवारी मुलगा किरण याने हिशोबात घोळ केल्याचे वडील हिरालाल यांच्या लक्षात आले. त्यांनी हिशोबात कमी असलेले ७०० रुपयांचा जाब मुलगा आकाशला विचारला. यातून बापलेकात वाद झाले. यामुळे संतापलेल्या आकाशाने वडिलांची धारदार शस्त्राने हत्या केली. यावेळी घरी असलेल्या सावत्र आई  किरण (४५ ) यांना देखील आकाशाने संपवले. यानंतर दोघांचे मृतदेह  वेगवेगळ्या मजल्यावर पलंगाच्या खाली लपवून तो फरार झाला. पोलिसांनी तांत्रिक तपास करत आकाशचे लोकेशन ट्रेस केले. तो शिर्डी येथे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी लागलीच याची माहिती शिर्डी पोलिसांना दिली. शिर्डी पोलिसांनी कारवाई करत लागलीच आकाशला ताब्यात घेतले आहे. 

बहिणीला सांगितले नातेवाईकांचा अपघात झाला
दरम्यान, आईवडिलांच्या खुनानंतर आकाशने सावत्र बहिणीला आम्ही नातेवाईकांचा अपघात झाल्याने धुळे येथे जात आहोत, तू काकांकडे थांब असे सांगितले होते. तिने रविवारी वडिलांचा दोन लागत नाही म्हणून घर गाठले. मात्र, घराला कुलूप असल्याने ती माघारी फिरली. चिंतेत असलेली मुलगी आज सकाळी पुन्हा घरी आली. यावेळी घरातून तीव्र दुर्गंधी येते होती. यामुळे मावशी सविता हिने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केल्यानंतर कलंत्री दाम्पत्याची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच मुलगा आकाश गायब असल्याने, बहिणीने दिलेली माहिती यावरून पोलिसांनी तपास सुरु केला. तपासांती पोलिसांनी आकाशचा शोध लावत त्याला ताब्यात घेतले.

Web Title: In Aurangabad Boy brutally kills parents for only Rs 700; The accused was arrested in Shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.