शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

अवैधरित्या २२ टन मांस नेणारा ट्रक पकडला

By admin | Updated: July 18, 2014 01:51 IST

हिंगोली : अवैधरित्या २२ टन मांस वाहून नेत असलेला ट्रक शहर पोलिसांनी १७ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास शहरातील नांदेड नाक्यावर पकडला.

हिंगोली : अवैधरित्या २२ टन मांस वाहून नेत असलेला ट्रक शहर पोलिसांनी १७ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास शहरातील नांदेड नाक्यावर पकडला. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.एक ट्रक नागपूरकडे मांस घेऊन निघाला असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे, उपअधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सतीशकुमार टाक, फौजदार सोनवणे यांच्या पथकाने नांदेड नाक्यावर सापळा लावला. या कारवाईत ट्रक क्र. एम. एच. ३१ डी. एस. - १३९३ मधून अवैधरित्या मांस नेताना सदरील वाहन पकडण्यात आले. या प्रकरणी फौजदार विवेक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोहंमद वसीम मो. शमी, भोजराव प्रभाकर खवसे, एकबाल काशीद इस्माईलखाँ पठाण, एजास अहमद अ. समद कुरेशी, असीफ कुरेशी (सर्व रा. नागपूर) यांच्याविरूद्ध शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी मोहंमद वसीम मो. शमी, भोजराव प्रभाकर खवसे, एकबाल काशीद इस्माईलखाँ पठाण या तिघांना अटक करण्यात आली आहे. शहर पोलिस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)