शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन नकाशावरील रेल्वेस्थानक दुर्लक्षित

By admin | Updated: July 25, 2014 00:52 IST

आंबा चोंढी : हिंगोली जिल्ह्यातील चोंढी रेल्वेस्थानक पुर्णा-अकोला मार्गावरील महत्वाचे ठिकाण आहे.

आंबा चोंढी : हिंगोली जिल्ह्यातील चोंढी रेल्वेस्थानक पुर्णा-अकोला मार्गावरील महत्वाचे ठिकाण आहे. विविध तीर्थक्षेत्रांमुळे देशातील पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या या रेल्वेस्थानकावर प्रवाशांना सोयी-सुविधा देण्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. चोंढी रेल्वेस्थानकाहून ज्योर्तिलींग औंढा नागनाथ, जैन मंदिर शिरडशहापूर, वाई येथील गोरखनाथ मंदिर, आंबा येथील भवानी मातेचे मंदीर तसेच अमरेश्वर महादेवाचे मंदिर जवळ आहे. त्याठिकाणचा कोल्हापूरी बंधारा गावकऱ्यांच्या वर्गणीतून उभारण्यात आलेला आहे. या मंदिराच्या पायथ्याशी काळाडोह नावाची जागा असून येथे आजही बेलाची पाने वाहत्या पाण्यात बुडाशी जातात, असे सांगितले जाते. तसेच भेंडेगाव येथील महानुभाव पंथाचे दत्त मंदिरही सर्वदूर प्रसिद्ध आहे. तेथे रेल्वे ट्रॅकसाठी भरपूर जागा आहे. नवीन ब्रॉडगेजचे काम सुरू असताना चोंढी येथून चाळीस डब्याच्या जवळपास दहा रेल्वे सोयाबीन चुऱ्याने भरून मुंबई येथे रवाना झाल्या. असे हे रेल्वे स्थानक आज दुर्लक्षित राहिले आहे. चोंढी येथील रेल्वे प्लॅटफॉर्म पुर्णपणे नादुरूस्त आहे. रेल्वेतून उतरताना पाय कोठे ठेवावा? असा प्रश्न पडतो. शिवाय तेथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही. याठिकाणी येणाऱ्या प्रवाशांसाठी बांधलेले प्रसाधनगृह बंद अवस्थेत आहे. कोणत्याच प्रवाशांसाठी प्रतिक्षालय नाही. शिवाय तेथे घाण साचलेली असते. सगळीकडे केळांची सालपटे, शेंगाची टरफले, पाण्याचे रिकामे प्लॉस्टिक पाऊच, तयार खाद्यपदार्थांची रिकामी पाकीटे पडलेली असतात. रात्रीच्या वेळी तर संपूर्ण प्लॅटफॉर्मवर फक्त दोन लाईट सुरू असतात. मागील मर्क्युरी बल्ब लावला जात नाही. तिकीट काढतेवेळी सुट्ट्या पैशांसाठी स्टेशन मास्तर व प्रवाशांदरम्यान तु-तु-मै-मै होत असल्याचे चित्र नेहमीच पहावयास मिळते. येथे रेल्वे कॅन्टीन नाही, रेल्वे येण्याची वेळ झाल्यास बेल वाजवली जात नाही. बिहार व उत्तर प्रदेशातील कर्मचारी मराठवाड्यातील जनतेला सापत्न वागणूक देतात. येथे संपूर्ण भारत वर्षात उत्तराखंड परिसरातील साधूंचे जत्थेच्या जत्थे पॅसेंजर रेल्वेने उतरतात. कोणत्याही लांब पल्ल्याच्या पॅसेंजर रेल्वे नाहीत. ‘ज्योर्तिलिंग औंढा नागनाथ के लिए यहाँ उतरिये’ असा बोर्ड लावलेला नाही. तर चोंढी स्थानकावर प्रवाशांची हेळसांड थांबवण्याची मागणी होत आहे. याठिकाणी सर्व सुविधा देऊन सिंकदराबादच्या जनरल मॅनेजरने येथील प्रवाशांची काळजी घ्यावी, अशी मागणी आंबा, चोंढी, शिरडशहापूर, कोर्टा, भेंडेगाव, महागाव, पांगरा बोखारे, वाई गोरखनाथ, कुरूंदा परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)